महामार्गाच्या भुयारी मार्गातून जातांना पांढर्‍या रंगाची साडी नेसलेली एक बाई समोर आल्यावर देवाच्या कृपेने रक्षण झाल्याची साधकाला अनुभूती येणे

श्री. अमित राणे

‘४.११.२०१८ या दिवशी (शनिवारी) मी कामावरून घरी जात होतो. मला घरी जाण्यास विलंब झाला होता. मी दहिसर स्थानकातून चालत येत होतो. मी महामार्गाचा (हायवेचा) भुयारी मार्ग पार करून जात होतो. अचानक पांढर्‍या रंगाची साडी नेसलेली एक बाई माझ्या समोर आली. तेव्हा ‘हे काही तरी वेगळेच आहे’, असे मला जाणवले. मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केली, ‘तुम्हीच माझे रक्षण करा.’ माझ्याकडे कापूर आणि अत्तर होते. त्यामुळे मी घाबरलो नाही. ती स्त्री माझ्याजवळ आली. माझ्या गळ्यात कृष्ण आणि मारुति यांची चित्रे असलेले सनातनचे पदक होते. मी ते पदक लगेच बाहेर काढले. ते पाहून ती मला म्हणाली, ‘गळ्यात हे पदक घातले आहेस; म्हणून वाचलास.’ तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘परात्पर गुरु डॉक्टर साधकांची किती काळजी घेतात !’ नंतर मी मागे वळून पाहिले, तर ती स्त्री दिसेनाशी झाली होती.’

– श्री. अमित अशोक राणे, बेलापूर, नवी मुंबई. (२.२.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक