शिर्डीला पायी पालखी घेऊन न येण्याचे आवाहन

शिर्डी (जिल्हा नगर) – शिर्डीत नाताळाची सुटी आणि ख्रिस्ती नववर्षाचे स्वागत साईबाबांच्या दर्शनाने करण्यासाठी मोठी गर्दी होत असते; मात्र या वर्षीही कोरोनाचे सावट कायम आहे. शिर्डीत दिवसभरात ‘ऑफलाईन’ आणि ‘ऑनलाईन’ पासद्वारे २५ सहस्र भक्तांना दर्शन दिले जाते. त्यामुळे साईंच्या दर्शनाला येतांना भाविकांनी ‘ऑनलाईन’ दर्शन पास घेऊनच शिर्डीला यावे. तसेच गर्दी टाळण्यासाठी पायी पालख्या घेऊन येऊ नये, असे आवाहन साईबाबा संस्थानने केले आहे.