मुंबई, २२ डिसेंबर (वार्ता.) – विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या ठिकाणी कोरोनाच्या लसीचे २ डोस घेणे अनिवार्य करण्यात आले होते. २२ डिसेंबर या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधीमंडळाच्या ठिकाणी प्रवेश करतांना भाजपच्या एका आमदारांकडे कोरोनाच्या लसीच दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र नव्हते. त्यामुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यांना विधीमंडळाच्या ठिकाणी प्रवेश देण्यात आला.