वेदांनी हिंदूंच्या ५ सांस्कृतिक मानबिंदूत ‘गोमाते’ला अनन्यसाधारण स्थान दिले आहे; पण धर्मांधांकडून गोमातेची प्रतिदिन सर्रासपणे हत्या होत आहे. गोपालनाचे महत्त्व लक्षात घेऊन सरकारने गोरक्षणासाठी अधिक प्रयत्न केले पाहिजेत. – संपादक
सांगवी (बारामती) – बारामती तालुक्यातील सांगवी येथे कत्तलीला घेऊन जाण्यासाठी टेम्पो आणि गोठ्यात बांधून ठेवलेल्या एकूण २९ जनावरांची पोलीस आणि गोरक्षक यांच्या साहाय्याने सुटका करण्यात आली, तसेच १ टेम्पो आणि १ लाख ३० सहस्र रुपये मूल्याची जनावरे, असा एकूण ११ लाख ३० सहस्र रुपये मूल्याचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करून जनावरांना गोशाळेत पाठवले आहे. या प्रकरणी मालक साकीब कुरेशी, टेम्पोचालक समीर शेख, बिलाल शेख, उस्मान शेख, युसूफ शेख यांच्या विरोधात गोरक्षक ऋषिकेश देवकाते यांनी बारामती पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी धाड टाकल्यावर एकूण २९ अशक्त आणि भुकेने व्याकुळ झालेली जनावरे दाटीवाटीने कोंबून बांधलेली होती. यांना कोणत्याही प्रकारच्या चारापाण्याची आणि औषधोपचाराची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. साकीब कुरेशी यास विचारणा केली असता ती गोठ्यातील जनावरे आमचीच असून ती कत्तल करण्यासाठी घेऊन जाणार असल्याचे सांगितले.