परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !
‘पूर्वीच्या युगांमध्ये समाज सात्त्विक होता. त्यामुळे ज्ञानयोग, ध्यानयोग, हठयोग यांसारख्या विविध मार्गांनी साधना करू शकत असे. कलियुगामध्ये समाज साधना करत नसल्यामुळे पूर्ण वातावरण रज-तमप्रधान झाले आहे. त्यामुळे पूर्वीसारख्या साधनामार्गांनी साधना करणे अतिशय कठीण झाले आहे. अशा या रज-तमप्रधान वातावरणातही साधना करता येण्यासाठी ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाची निर्मिती झाली आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२०.११.२०२१)