रानटी ब्रिटिशांचे भयानक क्रौर्य !

‘दुसर्‍या महायुद्धापूर्वी ब्रिटीश मिलिटरी वैज्ञानिकांनी सहस्रो हिंदुस्थानी सैनिकांना ‘मस्टर्ड गॅस’चे संशोधन करण्यासाठी गॅस चेंबर्समध्ये पाठवले. त्यातील असंख्य सैनिक विविध व्याधींनी मरण पावले. ‘मस्टर्ड गॅस’मुळे कर्करोग, लिंगावर परिणाम, तसेच नपुंसक होणे अशा प्रकारच्या विविध व्याधी होतात.

असंख्य भारतीय सैनिकांना कातडीवर जखमा झाल्या. ‘नॅशनल आर्चिव्हज’ने हा संपूर्ण अहवाल दिला आहे. दहा वर्षांपर्यंत हे संशोधन रावळपिंडीला (आता पाकिस्तानात) चालू होते. ‘Porton Down Chemical Warfare Establishment’ या संस्थेच्या वतीने हे संशोधन चालू होते. त्यातून पुढे माणसे मारणार्‍या विषारी वायूची उत्पत्ती झाली. जपानविरुद्ध ब्रिटिशांनी या विषारी गॅसचा प्रचंड वापर केला. ‘द गार्डियन’ या वृत्तपत्रात (२.९.२००७) हे विस्तृत वृत्त आहे. ते येथे अतीसंक्षिप्त स्वरूपात दिले आहे.’

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, मार्च २०१७)