सातारा, ९ डिसेंबर (वार्ता.) – कराड तालुक्यातील सहस्रो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या किल्ले सदाशिवगडावरील श्री सदाशिव मंदिराचा वीजपुवरवठा पूर्ववत् करण्यात आला आहे. पंचक्रोशीतील हजारमाची, बाबरमाची, राजमाची, वनवासमाची या ग्रामपंचायतींच्या वतीने ४७ सहस्र रुपयांचे थकीत वीजदेयक भरण्यात आले. त्यामुळे वीजपुरवठा पूर्ववत् झाला. दर सोमवारी भगवान श्री सदाशिवाच्या दर्शनासाठी येणार्यांना वीजेअभावी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते.