‘सनातन प्रभात’ हे एक परिपूर्ण माहितीचे वृत्तपत्र आहे ! – ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर, सातारा
श्री सद्गुरु डॉ. जयंतराव आठवले कृपा ! दैनिक ‘सनातन प्रभात’ हे एक परिपूर्ण माहितीचे वृत्तपत्र आहे. मी त्याचा नियमित वाचक आहे. इतर सर्व वर्तमानपत्रे टाळून मी ‘सनातन प्रभात’ आवर्जून वाचतो. हे वृत्तपत्र खर्या अर्थाने समाजप्रबोधनाचे, जनजागृतीचे आहे. वर्तमानपत्रात येणार्या सर्व गोष्टी सत्य असतात, त्यामुळे समाजातील सर्व स्तरांतील लोकांना न समजलेल्या गोष्टी समजतात. राष्ट्रभावना जागृतीसाठी, सत्य घटनांच्या माहितीसाठी, आदर्श हिंदु संस्कृतीविषयी खर्या राष्ट्रपुरुषांच्या माहितीसाठी, महान संतांच्या माहितीसाठी, ज्ञानासाठी हे वृत्तपत्र खरोखरच समाजोपयोगी, तसेच धर्मजागृतीसाठी आणि मनुष्याच्या ऐहिक अन् पारलौकिक जीवन उत्कर्षासाठी महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. आम्हास त्याचा पुष्कळ लाभ झाला आहे. या वृत्तपत्राला, त्याच्या कार्याला, सनातन संस्थेला, हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम !
दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे योग्य दृष्टीकोन मिळतो ! – पांडुरंग चव्हाण, व्यावसायिक, इचलकरंजी, कोल्हापूर
संपूर्ण दैनिक ‘सनातन प्रभात’च संग्रही ठेवावा, असा बहुमूल्य ठेवा आहे. दैनिकामुळे ‘हिंदु धर्माविषयी सतत जागृत कसे राहिले पाहिजे ?, हिंदूंची एकजूट कशी आवश्यक आहे ?’, यांसह अनेक गोष्टी मनावर बिंबतात. हिंदुत्व मनात भिनत रहाते, ते दैनिकातील विविध सदरांमुळेच ! देशात अनेक घटना घडतांना प्रत्येक पक्षाची भूमिका, वाहिन्यांचा मारा यांमुळे वैचारिक गोंधळ उडतो; मात्र दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे योग्य दृष्टीकोन मिळतो. साधनेचे मार्गदर्शन, इतरांच्या अनुभूती यांमुळे घरबसल्या सत्संग मिळतो. ‘अजून आम्ही काय केले पाहिजे ?’, याची जाणीव होते. संपूर्ण परिवाराला उपयुक्त असे हे दैनिक आहे.
दैनिक ‘सनातन प्रभात’ म्हणजे धगधगते, हिंदुत्वाची ज्योत सतत तेवत ठेवणारे एक परखड दैनिक ! – रवींद्र पावले, गडहिंग्लज, कोल्हापूर
मी गेल्या ८ वर्षांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’चा वाचक आहे. ‘सनातन प्रभात’ म्हणजे एक धगधगते, प्रखर निष्ठेने सत्याचा पाठपुरावा करणारे, तसेच हिंदुत्वाची ज्योत सतत तेवत ठेवणारे एक परखड दैनिक आहे. या दैनिकात राष्ट्रीय वृत्तांसह आध्यात्मिक मार्गदर्शन, धर्मशिक्षणाचे सविस्तर लेखन, सण-उत्सवांच्या वेळी केलेले आध्यात्मिक मार्गदर्शन, देशातील घडामोडींचे केलेले परखड विश्लेषण, पारंपरिक पद्धतीच्या संबंधी केलेले सूक्ष्म परीक्षण वाचण्यास मिळाल्याने या सर्व गोष्टी वाचकांना एक परिपूर्ण दैनिक वाचल्याचे समाधान देते. परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे तेजस्वी विचार, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी वेळोवेळी केलेले आध्यात्मिक मार्गदर्शन सर्व मानवजातीला अत्यंत उपयोगी आणि लाभदायक आहे.
‘सनातन प्रभात’ मधील लिखाण वाचायला अभिमान वाटतो ! – सौ. भामती हेगडे, सातारा
मी मराठी, हिंदी, कन्नड वर्तमानपत्रे वाचते. ‘सनातन प्रभात’ ‘डाऊनलोड’ करून घेतलेले आहे आणि मी नियमित वाचते. सनातन पत्रिकेतील लेखन योग्य, सत्य आणि स्पष्ट रूपाने प्रकट होत असल्यामुळे वाचायला अभिमान वाटतो. साधक आणि संत यांची माहिती प्रतिदिन असल्याने आम्हाला प्रेरणा मिळते. प्रत्येक बातमीला संपादकांचे मत वाचायला छान वाटते. आपुलकीने वाचावे, असे दैनिक आहे.
दैनिकातून धर्मशिक्षण चांगल्या प्रकारे दिले जाते ! – श्री. गणेश ठोंबरे, कराड
मी गेली ८ वर्षे दैनिकाचे वाचन करत आहे. दैनिकातून धर्मशिक्षण चांगल्या प्रकारे दिले जाते. त्यातील विषय चांगले असतात. मुलांनी आई-वडील यांच्याशी कसे वागावे ? मुलांना कसे हाताळावे ?, याचे चांगले मार्गदर्शन मिळते.