पणजी, २ डिसेंबर (पत्रक) – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या धर्मांध संघटनेकडून ६ डिसेंबरला बाबरी मशिदीविषयी फलक (पोस्टर) लावले जातात किंवा कार्यक्रम आयोजित केले जातात. याद्वारे त्यांच्याकडून राज्यातील धार्मिक सलोखा आणि शांती यांना बाधा पोचवली जाते. या संघटनेला ६ डिसेंबरला फलक लावण्यास किंवा कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी घालावी, अशी मागणी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी पोलीस महासंचालकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. २ डिसेंबरला हे निवेदन पोलीस महासंचालकांना देण्यात आले. या वेळी म्हापसा येथील गोमंतक मंदिर महासंघाचे श्री. जयेश थळी, श्री. चंद्रकांत (भाई) पंडित, राष्ट्रप्रेमी नागरिक श्री. रमेश नाईक, स्वराज्य गोमंतकचे श्री. अरुण नाईक, हिंदुत्व सेनेचे श्री. विनायक मुंगरे, सनातन संस्थेचे श्री. मनोहर नाईक आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रमोद तुयेंकर उपस्थित होते.
पोलीस महासंचालकांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेने फलक लावण्यासमवेत बाबरी मशिदीवर आधारित ‘लिस्ट वी फरगेट’ (Lest We Forget) या नावाने निबंध स्पर्धा आयोजित केली होती आणि सार्वजनिक सभाही घेतली होती. या संघटनेच्या कार्यक्रमांमधून यापूर्वी दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्यात आली होती. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या आतंकवादी आणि राष्ट्रद्रोही कारवाया, तसेच इसिस या आतंकवादी संघटनेशी असलेले त्यांचे संबंध यांसाठी केंद्र सरकार या संघटनेवर लक्ष ठेवून आहे.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या आतंकवादी आणि राष्ट्रद्रोही कारवायांची माहिती देणार्या काही बातम्यांची लिंक निवेदनात देण्यात आली आहे.
१. रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्याची केरळमध्ये हत्या : पोलिसांकडून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या आणखी एका पदाधिकार्याला अटक
https://www.timesnownews.com/india/kerala/article/rss-workers-murder-in-kerala-police-arrest-one-more-pfi-office-bearer/834719
२. प्राध्यापकावरील आक्रमणासाठी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून अर्थपुरवठा झाल्याविषयी अन्वेषण चालू
https://zeenews.india.com/news/kerala/kerala-funds-of-pfi-behind-attack-on-lecturer-under-scanner_639958.html
निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कारवायांविषयी पोलिसांत तक्रारी देण्यात आल्या आहेत.
निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या
१. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या धर्मांध आणि आतंकवादाचे आरोप असलेल्या संघटनेला गोव्यात कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यास अनुमती देऊ नये.
२. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना आणि त्यात सहभागी गोव्यातील व्यक्ती यांचा आतंकवादाशी आणि राष्ट्रद्रोही कारवायांत सहभाग आहे का ?, याचे अन्वेषण करावे.
३. ६ डिसेंबरला कोणत्याही प्रकारचे फलक लावले जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
४. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या गोव्यातील कार्यावर बंदी घालावी.