हिंदु जागरण वेदिकेच्या कार्यकर्त्याच्या हत्येच्या प्रकरणातील ९ धर्मांध आरोपींची निर्दोष मुक्तता

  • जर या आरोपींनी हिंदु कार्यकर्त्यांची हत्या केली नाही, तर कुणी केली ? याचा शोध पोलीस पुन्हा घेणार आहेत का ? कार्यकर्त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देणार आहेत का ? – संपादक
  • कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदु कार्यकर्त्यांच्या हत्या करणार्‍यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !- संपादक

मडिकेरी (कर्नाटक) – हिंदु जागरण वेदिकेचे कार्यकर्ते प्रवीण पुजारी यांच्या हत्येच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ९ धर्मांधांची येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. तुफैल, नयाज, आफरीन, महंमद मुस्तफा, इलियास, इरफान अहमद, मुजीब रहमान, शरीफ आणि हरीस अशी त्यांची नावे आहेत. ‘आरोपींना दोषी सिद्ध करण्यात फिर्यादी पक्ष अपयशी ठरला होता. त्यामुळे सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सत्याचा विजय झाला आहे. खोट्या आरोपाखाली सर्व ९ जणांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाचा निर्णय समाधानकारक आहे’, असे आरोपींचे अधिवक्ता टी.एच्. आबूबाकर यांनी सांगितले. (जर पोलीस आरोपींना दोषी सिद्ध करण्यात अपयशी ठरले असतील, तर राज्य सरकारने वरच्या न्यायालयात याला आव्हान देत पुन्हा प्रयत्न करायला हवा आणि कार्यकर्त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यायला हवा ! – संपादक)

१४ ऑगस्ट २०१६ या दिवशी ‘अखंड भारत संकल्प यात्रे’चा एक भाग म्हणून काढण्यात आलेल्या मशाल मिरवणुकीत सहभागी होऊन परतत असतांना गुड्डेहोसूरजवळ प्रवीण यांची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी २४ ऑगस्ट २०१६ या दिवशी वरील ९ जणांना अटक केली होती.