क्षत्रिय कुणाला म्हणावे ?

१. वेदांमध्ये क्षत्रियांविषयी ‘क्षतात् त्रायते इति क्षत्रियः ।’ (शब्दकल्पद्रुम) म्हणजे ‘संकटापासून रक्षण करतो, तो क्षत्रिय होय’, असे लिहिले आहे.
अर्थ : जो धर्म, समाज आणि मातृभूमी यांना कोणत्याही प्रकारची क्षती (हानी) पोचण्यापासून वाचवतो, तो ‘क्षत्रिय’ आहे, म्हणजेच धर्म, प्रजा आणि मातृभूमी यांचे रक्षण करणार्‍याला ‘क्षत्रिय’ म्हटले जाते.

२. गीतेत लिहिले आहे, ‘तेज, धैर्य, चातुर्य, युद्धातून पलायन न करणे, दान देणे हे सर्वच्या सर्व क्षत्रियाचे नैसर्गिक गुणधर्म आहेत. जो वर्ग दुर्बलांना साहाय्य करतो, तसेच धर्म, प्रजा आणि मातृभूमी यांचे रक्षण करतो, तो ‘क्षत्रिय’ आहे.’

लेखक : श्री. उकेशसिंह चौहान (साभार : ‘क्षात्रधर्म विचार मंथन’)