असुरक्षित कुर्ला शहर !
|
मुंबई – कुर्ला येथील एका तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी तरुणीचा प्रियकर रेहान शेख आणि त्याचा मित्र फैजल शेख यांना अटक केली आहे.
कुर्ला येथे एच्.डी.आय.एल्. कंपाऊंडमधील एका रिकाम्या इमारतीच्या छतावर उद्वाहनाच्या खोलीत २५ नोव्हेंबर या दिवशी एका २३ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. बलात्कार करून तिची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. तरुणीवर २६ वेळा वार केल्याचे निष्पन्न झाले आहे. इतकेच नव्हे तर हातोड्याने युवतीचे डोके फोडले आहे. युवतीचा एक डोळा त्यामुळे बाहेर आला होता. (धर्मांधांची क्रूरता जाणा ! – संपादक)
पोलिसांनी तपासाअंती कुर्ला येथून वरील २ जणांना कह्यात घेऊन त्यांची चौकशी केली. युवती लग्नासाठी विचारत होती आणि रेहान याला लग्न करायचे नसल्याने रेहान याने युवतीची फैजलच्या साहाय्यान हत्या केल्याचे मान्य केले.
तरुणीच्या शवविच्छेदन अहवालानंतर आरोपीवर बलात्कार आणि हत्येचा गुन्हा नोंद केला आहे.
काही मुले या इमारतीत चित्रीकरण करायला आली होती. त्या वेळी त्यांना युवतीचा मृतदेह आढळून आला. आरोपी युवतीची क्रूरपणे हत्या करून छिन्नविछिन्न मृतदेह तसाच सोडून गेले होते.