मथुरेमध्ये प्रशासनाकडून जमावबंदी लागू !

श्रीकृष्ण जन्मभूमीवरील ईदगाह मशिदीत ६ डिसेंबरला श्रीकृष्णाची मूर्ती स्थापन करून अभिषेक करण्याच्या हिंदु महासभेच्या घोषणेचा परिणाम

मथुरा येथील श्रीकृष्ष जन्मभूमी

मथुरा (उत्तरप्रदेश) – हिंदु महासभेने येत्या ६ डिसेंबर या दिवशी येथील श्रीकृष्ष जन्मभूमीवरील ईदगाह मशिदीत जाऊन श्रीकृष्णाच्या मूर्तीची स्थापना करून तिला अभिषेक करण्यात येणार असल्याची घोषणा केल्याने प्रशासनाने येथे जमावबंदी लागू केली आहे. ६ डिसेंबर याच दिवशी वर्ष १९९२ मध्ये बाबरी ढाचा पाडण्यात आला होता. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदी लागू केली आहे. ‘कुणीही अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल’, अशी चेतावणी पोलिसांनी दिली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक हिंदु अन् मुसलमान यांच्या प्रमुख लोकांशी संपर्क साधत आहेत, तसेच ठिकठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत.