असे प्रसंग होऊन जीवित आणि वित्त हानी होणे, हे नवीन नाही ! अनेक वर्षे होऊनही भटक्या गुरांच्या प्रश्नी तोडगा न निघणे, हे प्रशासनाचे अपयश !
फोंडा, २५ नोव्हेंबर (वार्ता.) – पहाटे ४ वाजता कुर्टी (खांडेपार) महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ३ गुरे ठार झाली, तर ६ गुरे गंभीररित्या घायाळ झाली आहेत. घायाळ गुरांवर उपचार करणारे स्थानिक विराज सप्रे आणि निखिल देसाई म्हणाले, ‘‘लोक प्रत्येक तालुक्यात भटक्या गुरांना ठेवण्यासाठी ‘कॅटल पाऊंड’ची मागणी करत आहेत. रस्त्यावर बसलेली भटकी गुरे एकतर मरतात किंवा अपघात होऊन वाहनचालकांचा विशेषतः दुचाकीस्वारांचा मृत्यू होतो. गोशाळेच्या अभावी भटकी गुरे रस्त्यावर असल्याने या घटना घडत आहेत. पहाटे अपघात झाल्यानंतर वेळेवर साहाय्य न मिळाल्याने ३ गुरांचा मृत्यू झाला. घायाळ झालेल्या अन्य गुरांना सकाळी ९.३० वाजता प्राणी बचाव पथकाकडून वैद्यकीय साहाय्य मिळाले.’’
‘भटक्या गुरांचा प्रश्न सोडवायला राजकारण्यांना वेळ आहे का ?’, असा प्रश्न स्थानिक लोक उपस्थित करत आहेत.