‘गोवा राज्यातील नाणूस, वाळपई येथे ‘अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्रा’त ४०० हून अधिक गीर गायी आणि अन्य देशी गायी यांचे संगोपन अन् संवर्धन केले जाते. या केंद्राचे दायित्व कै. रामचंद्र जोशी सांभाळत होते. २८.५.२०२० या दिवशी त्यांचे निधन झाले. आता हे दायित्व त्यांचे सुपुत्र श्री. लक्ष्मण रामचंद्र जोशी पहात आहे. कै. रामचंद्र जोशी यांच्या मृत्यूपूर्वी त्यांची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के होती.’ १२.११.२०२१ या दिवशी मी त्यांचे छायाचित्र पाहिल्यावर मला त्यांच्या संदर्भात सूक्ष्मातून पुढील सूत्रे जाणवली.
१. त्यांच्याकडे पाहिल्यावर माझा भाव जागृत झाला.
२. त्यांच्याकडून निर्गुण-सगुण स्तरावरील चैतन्याच्या लहरींचे प्रक्षेपण होऊन वातावरणात शीतलता पसरत आहे.
३. त्यांचा तोंडवळा चैतन्यामुळे पुष्कळ पिवळसर आणि तेजस्वी झालेला आहे.
४. मला त्यांच्या गळ्यात सूक्ष्मातून झेंडूच्या फुलांचा हार असल्याचे दिसले. संतपद प्राप्त केल्यावर संतांना पुष्पहार घालून त्यांचा सन्मान करतात, त्याप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले सूक्ष्मातून कै. रामचंद्र जोशी यांच्या गळ्यात पुष्पहार घालत असल्याचे जाणवले. मला काही वेळ झेंडूचा अन् काही वेळ चंदनाचा सुगंध आला.
५. त्यांचे छायाचित्र पहात असतांना त्यातून आनंदाच्या लहरी माझ्या दिशेने येतांना जाणवल्या.
६. त्यांच्या छायाचित्रामध्ये पिवळसर रंगांचे जनलोकाचे वायुमंडल निर्माण झाल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांच्या छायाचित्रातून प्रक्षेपित होणार्या चैतन्य आणि आनंद यांच्या लहरींमुळे वातावरणाची शुद्धी झाल्याचे जाणवले.
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.११.२०२१)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |