अमेरिकेची हिंदु राष्ट्राच्या दिशेने वाटचाल ?

भारतीय संस्कृतीशी समरस झालेल्या अमेरिकन युवती

उत्तर आणि दक्षिण खंडामध्ये विभागलेला अमेरिका, एक असा देश जेथे दिवसेंदिवस हिंदु धर्म झपाट्याने पसरत आहे. भलेही आमच्या भारतात हिंदुत्व आणि भारतीय संस्कृती यांविषयी गोंधळ असेल किंवा हिंदुत्वाच्या आडून सांप्रदायिकतेचा रंग देण्याचा प्रयत्न होत असेल; परंतु सामर्थ्यशाली अमेरिका दिवसेंदिवस भारतीय संस्कृती अन् हिंदु धर्म यांचा स्वीकार करत आहे. अमेरिकी लोकांचा ओढा हिंदु धर्माकडे वाढत आहे. अशा वेळी प्रश्न येतो की, येत्या काळात अमेरिका हिंदु राष्ट्रामध्ये परावर्तित होईल ?

हिंदु धर्मावर टीका करण्यात येणार्‍या अमेरिकेत हिंदु परंपरांचा वाढता प्रभाव

अमेरिकन युवक आरती करतांना

हिंदु कुणासाठी सनातन धर्म, तर कुणासाठी जीवन जगण्याची पद्धती आहे. विश्वातील सर्वांत पुरातन धर्म असलेल्या हिंदु धर्माचे तत्त्वज्ञान आणि संस्कृती यांमुळे प्रभावित होऊन समस्त अमेरिका हिंदुत्वाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. प्रत्येक वर्षी सहस्रोंच्या संख्येने लोक हिंदु धर्माचा स्वीकार करत आहेत. असे म्हणतात की, सध्या जगात हिंदु धर्माचे कोणते केंद्र असेल, तर ते अमेरिका आहे ! एक काळ असा होता, जेव्हा अमेरिकेच्या भूमीवर हिंदु धर्माची चेष्टा केली जात होती, धर्मावरील विश्वासाला अंधश्रद्धा समजले जात होते आणि धर्माशी संबंधित असलेल्या श्रद्धेला अवडंबर म्हटले जात होते. आज त्याच अमेरिकेच्या भूमीवर योग करण्यासह सूर्यनमस्कार होत आहेत. गायत्री मंत्रापासून महामृत्यूंजय मंत्राचा जप करण्यात येत आहे आणि हिंदु परंपरांमुळे प्रभावित होऊन हिंदु धर्माचा स्वीकार करण्यात येत आहे. तथापि विश्वातील सर्वांत व्यस्त न्यूयॉर्कच्या टाइम्स चौकात प्रतिवर्षी योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

नॉस्ट्रेडॅमसची हिंदु धर्माच्या उत्थानाची भविष्यवाणी सत्यात उतरत असल्याचे दिसणे

नॉस्ट्रेडॅमस

अमेरिकी यहुदींपासून ख्रिस्ती नागरिक हातामध्ये लाल धागा बांधत आहेत. हिंदु परंपरेप्रमाणे आप्तांचे श्राद्ध करण्यासह त्याचे शिक्षणही घेत आहेत. अमेरिकेतील सामान्य लोकांपासून गणमान्य व्यक्तींनी हिंदु धर्म स्वीकारला आहे. या सर्व गोष्टी म्हणजे नॉस्ट्रेडॅमसची हिंदु धर्माच्या उत्थानाची भविष्यवाणी सत्यात उतरत असल्याचे दिसून येत आहे ! असे म्हणण्याचे कारण की, फेसबूकचे मुख्याधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी त्यांच्या यशामागे नीम करौली बाबा यांचा हात असल्याचे म्हटले होते. अमेरिकेच्या संसदेत गीतेवर हात ठेवून शपथ देण्यात येते. दुसरीकडे हॉलिवूडमधील सर्व वलयांकित व्यक्ती त्यांच्या जीवनात हिंदुत्वाचा रंग भरत आहेत.

गायक, उद्योगपती यांच्यापासून ते राजकारण्यांपर्यंत सर्वांचा हिंदु धर्माकडे वाढत असलेला ओढा

डोनाल्ड ट्रम्प दीपप्रज्वलन करतांना

दिवसेंदिवस मोठ्या संख्येने अमेरिकी लोक हिंदु धर्माशी जोडले जात आहेत. मार्क झुकेरबर्गही लोकांचे नशीब बनवणार्‍या नीम करौली बाबांच्या समोर नतमस्तक होण्यासाठी स्वत: नैनितालला पोचले आणि तेही ‘ॲपल’चे संस्थापक स्टीव्ह जॉब यांच्या सांगण्यावरून ! स्टीव्ह जॉब यांनीच त्यांना महाबली हनुमानस्वरूप नीम करौली बाबा यांच्याकडे जाण्याचा मार्ग दाखवला होता. अमेरिकी सिनेट तुलसी गबार्ड यांनी पवित्र गीतेवर हात ठेवून शपथ ग्रहण केली. अलीकडेच हॉलिवूडचे महान अभिनेता सिल्वेस्टर स्टेलॉन त्यांच्या मुलाचे हिंदु परंपरेनुसार श्राद्ध करण्यासाठी भारतात आले होते. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेचे प्रसिद्ध क्रिकेटपटू जॉन्टी र्‍होड्स यांनी मानसिक शांतीसाठी हिंदु मंदिरांमध्ये यज्ञयाग केले. एवढेच नाही, तर ते भारतीय संस्कृतीमुळे एवढे प्रभावित झाले की, त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव ‘इंडिया’ ठेवले. अमेरिकेत जन्मलेल्या ज्युलिया रॉबर्ट्स यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये अभिनय करून हॉलिवूड चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनीही अनेक प्रसंगांमध्ये स्वत: हिंदु असल्याचे सांगितले. प्रसिद्ध संगीतकार जॉन कॉल्ड्रॉन यांचे पालनपोषण एका ख्रिस्ती कुटुंबात झाले; पण आता त्यांनी हिंदु धर्म स्वीकारला आहे. अमेरिकी गायक ट्रेवर हॉल अशा प्रकारे हिंदु धर्माने प्रभावित झाले की, त्यांच्या गीतामध्ये संस्कृत मंत्रांना स्थान असते. आज ते भारतामध्ये साधूचे जीवन व्यतीत करत आहेत. गॅरी जॉन्सन ज्यांनी एक ‘बॅण्ड’ (वाद्यवृंद) ३० वर्षे चालवला, त्यांचा लहानपणापासून हिंदु धर्माकडे ओढा राहिला आहे. मृत्यूपश्चात त्यांच्या अस्थी ऋषिकेश येथील गंगा नदीत प्रवाहित करण्यात आल्या. जॉर्ज हॅरिसन यांना जगातील सुप्रसिद्ध रॉकस्टार म्हणून ओळखले जातात. त्यांनी वर्ष १९६० मध्ये ख्रिस्ती धर्म सोडून हिंदु धर्म स्वीकारला. ते नेहमी त्यांच्या ‘बॅण्ड’मध्ये हिंदु धर्माचा प्रचार करायचे. मृत्यूनंतर त्यांच्याही अस्थी गंगा-यमुनामध्ये प्रवाहित करण्यात आल्या.

एवढेच नाही, तर अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा त्यांच्या खिशामध्ये हनुमान चालिसा आणि हनुमानाची मूर्ती ठेवतात. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनाही चांगले ठाऊक आहे की, त्यांच्या देशातील लोक मोठ्या संख्येने हिंदुत्वाकडे झुकत आहेत आणि तेथे हिंदूंची बरीच मोठी लोकसंख्या आहे. त्यामुळे त्यांना राष्ट्रपती निवडणुकीच्या पूर्वी भारत दौर्‍यावर यावे लागले.

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा सांस्कृतिक कार्यक्रमात संवाद साधतांना

अमेरिका हिंदु राष्ट्रात परावर्तित होण्याची शक्यता

हिंदु धर्म एक असा धर्म आहे, जो लोकांना निसर्गाशी जोडतो, अहिंसा आणि शांती यांचा धडा देतो. विश्वातील सर्वांत प्राचीन आणि तिसरा मोठा धर्म समजला जातो. एका दृष्टीने पाहिले, तर हिंदु धर्म ‘जीवन कसे जगायचे ?’, हे शिकवतो. हिंदु धर्माच्या याच गोष्टींनी प्रभावित होऊन अमेरिकेतील अधिकाधिक लोक हिंदु धर्म स्वीकारत आहेत. त्यामुळे तो दिवस फार लांब नाही, जेव्हा अमेरिका हिंदु राष्ट्रात परावर्तित होऊ शकेल. आपल्याला काय वाटते ? ज्या प्रकारे अमेरिकी लोक मोठ्या संख्येने हिंदुत्वाकडे अग्रेसर होत आहेत आणि हिंदु धर्म स्वीकारत आहेत, यावरून अमेरिकाही एक दिवस हिंदूबहुल देश होऊ शकेल ?

संदर्भ : संकेतस्थळ