ख्रिस्ती प्रचारकांचे षड्यंत्र : ब्राह्मणविरोध !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

‘आधीच्या काळात ब्राह्मणांचा समाजावर मोठा प्रभाव होता. त्यामुळे १६ व्या शतकातच ‘हिंदु समाजाला ख्रिस्ती करण्यासाठी ब्राह्मणांचा हा प्रभाव तोडणे आवश्यक आहे’, हे फ्रान्सिस झेविअर याने जाणले. त्यामुळे हा प्रभाव संपवण्यासाठी त्याने सर्वप्रथम ब्राह्मणांना लक्ष्य केले. अर्थात ब्राह्मणविरोध हा हिंदु धर्माला संपवण्याच्या नीतीचा एक भाग आहे. लहानमोठ्या त्रुटी मानवजातीमध्ये सगळीकडे दिसून येतात; परंतु भारतामध्ये त्या त्रुटींना विकृत स्वरूप देऊन ‘ब्राह्मणवाद’ निर्माण करण्यात आला.

डॉ. कुनराड एल्स्ट यांच्या मते, ‘विश्वाच्या इतिहासामध्ये यहुदींच्या विरोधाप्रमाणे ब्राह्मणांचा विरोध हेही ख्रिस्ती प्रचारकांनी चालवलेले एक अपप्रचार अभियान आहे.’ विदेशी ख्रिस्ती प्रचारकांनी ब्राह्मणांवर टीका करण्यास आरंभ करण्यापूर्वी सर्व देशी-विदेशी लेखक आणि विद्वान यांनी ब्राह्मण, तसेच हिंदु समाज यांची मुक्त कंठाने प्रशंसा केलेली आहे. आज भारतामध्ये ब्राह्मणविरोध ही अधिकृत विचारसरणी बनली आहे. यामध्ये राजकारणादी विचारहीन होऊन योगदान देत आहेत.

ख्रिस्ती प्रचारकांच्या सततच्या अपप्रचारामुळे शिक्षण व्यवस्थेतही चुकीच्या आणि विषारी गोष्टी घुसडल्या गेल्या, त्यांचा हिंदु समाजाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. आज बहुतांश भारतीय नेते आणि बुद्धीजिवी यांना ब्राह्मणद्वेषी गोष्टी खर्‍या वाटतात. ब्राह्मणांनी ख्रिस्ती धर्मांतराला विरोध केला. त्यामुळे ते ख्रिस्त्यांचे लक्ष्य ठरले. हिंदूंना ख्रिस्ती बनवणे सोपे जावे, यासाठी ख्रिस्ती प्रचारकांनी सर्वप्रथम ब्राह्मणांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला; कारण समाजातील उच्च लोकांना ख्रिस्ती बनवले, म्हणजे इतरांना फूस लावता येते; पण यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे त्यांनी ब्राह्मणांना संपवण्याचे धोरण आखले.

सामाजिक भेदभाव मानणारा ख्रिस्ती पंथ !

रॉबर्ट नोबिली यांचा हिंसेऐवजी विश्वासघातावर अधिक विश्वास होता. चर्चने वर्ष १८-१९ च्या शतकापर्यंत समानतेच्या विचारांचा तीव्र विरोध केला होता. ते विशिष्ट वर्ग आणि अनुवांशिक सत्ता यांचे समर्थक होते. जेव्हा जगात समानतेचे वातावरण निर्माण होऊ लागले, तेव्हा चर्चने रंग पालटून स्वत:ला शोषित आणि पीडित समर्थक सांगणे चालू केले. गोव्यामध्ये आजही अनेक चर्च विशिष्ट जातीच्या लोकांना येण्याजाण्यासाठी स्वतंत्र दारे ठेवतात. अशा गोष्टी आजपर्यंत कोणत्याही हिंदु मंदिरात आढळून आल्या नाहीत. भारतात प्रत्येक जातीची एक वेगळी प्रतिष्ठा होती. त्यांच्यात हीनतेची भावना पुष्कळ अल्प होती. जातींमुळे इस्लामी आणि ख्रिस्ती यांची आक्रमणे सहन करूनही हिंदू शिल्लक राहिले. गेल्या १०० वर्षांत ख्रिस्ती प्रचारकांचे कनिष्ठ जातीचे आणि वनवासी लोक मुख्य बळी ठरले आहेत. त्यांच्या शाळांमध्ये भारतीय इतिहास आणि संस्कृती यांच्याविषयी विकृत माहिती शिकवण्यात येते.

ख्रिस्ती प्रचारकांना जे यश इंग्रजांच्या काळात मिळाले नाही, त्याहून अधिक यश स्वतंत्र भारतात मिळाले !

स्वतंत्र भारतात ख्रिस्ती प्रचारकांना सरकार आणि विविध राजकीय पक्ष यांच्याकडून विशेष आदर आणि सन्मान देण्यात आला. भारताच्या एका पंतप्रधानानेही म्हटले होते, ‘ब्राह्मणांना अनेक शतके केलेल्या छळाचा पश्चाताप करावा लागेल.’ अशा प्रकारे ख्रिस्ती प्रचारकांचे ‘सफेद झूठ’ भारत सरकारचा अधिकृत, धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि राष्ट्रवादी सिद्धांत बनला. असे यश ख्रिस्ती प्रचारकांना इंग्रजांच्या काळातही मिळाले नव्हते. इंग्रजांनी या प्रचारकांवर अंकुश ठेवला होता; परंतु भारतीय शासनकर्त्यांनी त्यांना उघड सवलत दिली आहे. परिणामी हिंदु समाजाला विविध माध्यमांतून तोडण्यात येत आहे. आमचे शासनकर्ते सर्व जाणतात; परंतु ते लोभापायी आंधळे होऊन ‘अल्पसंख्यांक’, ‘विशेषाधिकार’ आदींना महत्त्व देऊन ज्या फांदीवर ते बसले आहेत, ती फांदी तोडण्यासाठी प्रयत्नरत आहेत.

(संदर्भ : ‘नया इंडिया’ संकेतस्थळ)