‘जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना जिवंत असते, तोपर्यंत ते राष्ट्र मानाने जगू शकते. जेव्हा व्यक्ती देशहितापेक्षा स्वहिताकडेच लक्ष देऊ लागते, त्या वेळी तो समाज आणि देश अधोगतीस जातो. जर प्रत्येकजण स्वार्थामुळे समाज लुटावयास लागला, लाच घेऊ लागला, तर असा समाज खिळखिळा होण्यास आणि मोडकळीस यावयास कितीसा वेळ लागणार ? प्रत्येकाचा स्वार्थ बळावला की, माणसे एकमेकांची डोकी फोडतात; पण निःस्वार्थी राष्ट्रप्रेम प्रज्वलित झाल्यास सर्वांची एकजूट होऊन राष्ट्र बलवान आणि सामर्थ्यशाली होते.