पुणे येथे कौटुंबिक कलहातून अल्पवयीन मुलीचे घरातून पलायन, आपल्याच कुटुंबाकडे ५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी !

शिक्रापूर (जिल्हा पुणे) – मूळ छापरा (बिहार) येथील पण सध्या शिक्रापूर येथे रहात असलेले एक कुटुंब त्यांच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार घेऊन आले होते. घरातील कुटुंबियांचे स्वास्थ्य, कुटुंबातील सदस्यांची व्यसने, एकमेकांविषयीचे वर्तन, कौटुंबिक मानसिक स्वास्थ्य या कारणांना कंटाळून एका अल्पवयीन मुलीने घरातून पलायन केले आणि भ्रमणभाषमधून ५ लाखांची खंडणी मागण्याचा संदेश घरातील लोकांना पाठवला. विशेष म्हणजे आपल्याच भ्रमणभाषवरून आपले अपहरण झाल्याचा संदेश टाकून तिने संपूर्ण कुटुंबाला मानसिक तणावात ठेवले. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करीत अवघ्या ६ घंट्यामध्ये मुलीला पकडले. या मुलीचा भ्रमणभाष चालूच असल्याने तिचा शोध घेणे सहज शक्य झाले.

मुलगी अल्पवयीन असल्याने या संपूर्ण कुटुंबाचेच मानसिक समुपदेशन करण्याचाही निर्णय शिक्रापूर पोलिसांनी घेतल्याचे शेडगे यांनी सांगितले.