श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवद आश्रमात आल्यावर साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

१. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या स्वागताप्रीत्यर्थ लावलेला फलक वाचून मन आनंदाने भरून येणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

‘१५.९.२०१९ या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवद आश्रमात आल्या असल्याचे मला ठाऊक नव्हते. दुसर्‍या दिवशी मी जेव्हा भोजनकक्षात आले, तेव्हा त्यांच्या स्वागताप्रीत्यर्थ लावलेला फलक वाचून माझे मन आनंदाने भरून आले. ‘तो फलक पुनःपुन्हा वाचावा. फलकाजवळ उभे रहावे’, असे मला वाटत होते.

सौ. मीना खळतकर

२. ‘ श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना खाऊ देऊया’, असा विचार मनात आल्यावर त्याविषयी साधिकेला विचारणे, तिने ‘ श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ उद्याच रामनाथीला निघणार आहेत’, असे सांगितल्यावर तिच्याजवळ खाऊ देणे आणि ‘आपला विचार देवीजवळ पोचला’, असे वाटून आनंद होणे

२०.९.२०१९ या दिवशी माझ्याजवळ एक खाऊ होता. ‘तो श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना देऊया’, असा विचार माझ्या मनात आला; परंतु दोन दिवस झाले, तरी माझ्याकडून तो खाऊ त्यांना दिला गेला नव्हता. रात्री ११.३० वाजता मला ‘ श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना खाऊ द्यायचा आहे’, याची मला आठवण झाली. त्याविषयी मी कु. स्नेहा झरकर हिला दूरभाष करून विचारले. तेव्हा तिने सांगितले, ‘‘काकू, आत्ताच द्या. त्या सकाळी ८ वाजता रामनाथीला जाणार आहेत.’’ तेव्हा ‘माझा विचार देवीजवळ पोचला’, असे वाटून मला आनंद झाला आणि मी स्नेहाताईकडे खाऊ दिला.

३. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवद आश्रमात आल्यावर आश्रमात जाणवलेला पालट

अ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवद आश्रमात आल्यावर आश्रम चैतन्याने भारल्यासारखा जाणवू लागला.

आ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या दर्शनाने आणि स्मरणाने आनंद मिळत होता. इतर वेळी पितृपक्षात जडपणा जाणवतो; मात्र या वेळी हलकेपणा जाणवत होता.

४. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवद आश्रमातून निघाल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

अ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ निघण्याच्या वेळी आम्ही काही साधक ‘देवीचे दर्शन होणार’, या भावाने त्यांची वाट पहात होतो. त्या आल्या आणि म्हणाल्या, ‘‘तुम्हा सर्वांना नमस्कार करते. तुम्ही मला भरभरून प्रेम दिले.’’ ‘खरेतर देवीनेच आम्हाला प्रेम दिले; पण तिने मात्र साधकांचेच कौतुक केले’, असे वाटून माझी भावजागृती झाली.

एका साधकाने जयघोष केल्यावर त्यांनीही हात वर करून सर्वांकडे कौतुकाने आणि वात्सल्यभावाने पाहून जयघोष केला.

आ. साधकांनी ‘तुम्ही लवकर या’, असे म्हटल्यावर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘मी जात आहे’, असे मला वाटतच नाही. मी इथेच आहे.’’ तेवढ्यात गाडी चालू होत असतांना जवळील मंदिरात महालक्ष्मीची आरती चालू झाली.

इ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ गाढी नदीची ओटी भरत असतांना वातावरणात पुन्हा देवीची आरती चालू असल्याचा स्वर उमटला होता. त्यानंतर शिवाची आरती झाली. आरती संपल्यावर ‘मागतो मी देवा…’ हे भजन चालू झाले. हे सर्व पहात असतांना माझे हृदय भरून आले.

ई. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवीची ओटी भरत होत्या. त्या वेळी ‘तेथे प्रत्यक्ष नर्मदादेवी आली आहे’, असे मला जाणवले.

उ. एरव्ही कुणी आश्रमातून निघाल्यावर माझ्या डोळ्यांतून अश्रू येतात; मात्र श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितलेले ‘मी इथेच आहे’, हे वाक्य आठवून माझ्या डोळ्यांतून अश्रू आले नाहीत. त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. मीना खळतकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.९.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक