ईश्वराची मानवाला मिळालेली दैवी देणगी : वनस्पती !

१२ नोव्हेंबर या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाद्वारे वनस्पतींचा गंध, त्यांचे स्पर्शज्ञान, त्यांची विचारक्षमता यांविषयीची माहिती पाहिली. त्यापुढील माहिती आजच्या लेखातून जाणून घेऊया.

‘पाम ट्री’प्रमाणे भासणारी ‘रावेनाला’ वनस्पती

मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा ः https://sanatanprabhat.org/marathi/526420.html


१०. वनस्पतीचा प्रतिसाद

१० अ. दिशादर्शक प्रतिसाद : ‘दिशादर्शक प्रतिसाद (Tropic response) हे प्रकाश, गुरुत्वाकर्षण आणि पाणी या दृष्टीने असते.

१० अ १. वनस्पतीमध्ये काही वेली असतात. त्या इतर झाडांचा आधार घेऊन वाढतात. अशा वनस्पतीतील प्रतानारोही (Tendril) नावाच्या रचनेमुळे त्या इतर झाडांना गुंडाळू शकतात आणि त्यांचा आधार घेतात.

१० अ २. प्रकाशाच्या दिशेने झाड वळते, तसेच प्रकाशाच्या दिशेने फुले उगवतात.

१० अ ३. फांदी सरळ उगवत असतांना सूर्याची किरणे जर तिरपी येत असतील, तर फांदी सूर्याच्या दिशेकडे वळते. या वळण घेणार्‍या भागावर ‘ऑक्झिन’ (Auxin) नावाच्या वनस्पतीचे रसायन कार्यरत होते आणि अगोदरच्या फांदीपासून फांदी सूर्याकडे वळण घेते. अशा प्रकारच्या तत्त्वावर मुळे जमिनीत सरळ जातात आणि पाणी शोषून घेतात.

प्राण्यांचे आधुनिक वैद्य (डॉ.) अजय जोशी

१० आ. विविधांगी प्रतिसाद : हे स्पर्श किंवा संवेदना (vibration) संबंधित असतात. हे क्षणिक असते. हे वनस्पतीच्या वाढीमध्ये पालट करत नाहीत.

१० आ १. स्पर्श झाल्यावर वनस्पतीची पाने मिटणे : एखाद्या वनस्पतीस आपण स्पर्श करतो, तेव्हा ती वनस्पती जी प्रतिक्रिया देते, त्याला ‘थिगमोनॅस्टी’ (Thigmonasty) असे म्हणतात. लाजाळू वनस्पतीला स्पर्श केल्यानंतर तिची पाने मिटतात. ‘पोटॅशियम आयान्स’मुळे (Potassium ions) पेशीमध्ये असा पालट होतो. पानातील पाणी देठाकडे (Vascular system) वळते आणि पाने मिटतात. काही वेळानंतर पाने पूर्ववत् होतात. अशा कृतीतून वनस्पती धोक्यातून स्वतःचे रक्षण करते.

१० आ २. किड्याला आकर्षित करून वनस्पतीचा एक भाग बंदिस्त होणे : ‘व्हेनस फ्लाय ट्रॅप’ या वनस्पतीत एक डबी असते. त्यातील डबीत असणारा विशिष्ट वास, विशिष्ट द्रव्य आणि रंग यांमुळे किडे त्याकडे आकर्षिले जातात. ते वनस्पतीच्या डबीत बंद होतात. ही वनस्पती किड्यातून प्रथिने शोषून वनस्पतीची नायट्रोजन आणि फॉस्फरस यांची कमतरता दूर करते; कारण जिथे ही वनस्पती उगवते, त्या प्रदेशात मुळात जमिनीतच नायट्रोजन आणि फॉस्फरस अल्प आहे. ईश्वरानेच ही सोय केली. ‘येणारे किडे भक्ष आहेत आणि त्यांना बंदिस्त करायचे आहे’, हे वनस्पतीला कसे कळते ? २० सेकंदांमध्ये किडे बंदिस्त होण्याची क्रिया घडते. त्यासाठी २ केसांना (Hair) तरी स्पर्श होणे आवश्यक आहे. ही वनस्पती पाण्याचे थेंब आणि किडे यातील भेद जाणते, हेही विशेष आहे. हे मानवनिर्मित नसून देवाची निर्मिती आहे.

१० आ ३. बुरशी हा वनस्पतीचा प्रकार आहे. त्यांना स्वतःच्या वाढीसाठी प्रकाशाची आवश्यकता आहे. (काही वनस्पती अंधारातही वाढतात.)

१० आ ४. प्रकाश आणि गुरुत्वाकर्षण हे दोघे वनस्पतीच्या वाढीसाठी योग्य दिशा देतात.

१० आ ५. वनस्पतीच्या पेशीत हरितलवके असतात. ज्यांत पानातील हरितद्रव्य (Chlorophyll) असते. या हरित द्रव्यामुळेच वनस्पती हिरवी दिसते. हरित द्रव्यामुळेच प्रकाशसंश्लेषण (Photosynthiris) प्रकाशाच्या उपस्थितीत होते आणि वनस्पती त्यातून साखर (शक्ती) (Sugar) निर्माण करते, जी वनस्पती पेशी वापरतात. प्राण्यांच्या पेशीत हरितलवके नसतात.

१० आ ६. ‘क्रिप्टोक्रोम’ (Cryptochrome) हे एक प्रथिन आहे, ते वनस्पतीत (प्राण्यातही) असते. त्याची सूर्यप्रकाशातील निळ्या प्रकाशासमवेत प्रक्रिया होते. ‘क्रिप्टोक्रोम’ वनस्पतीला बहर येण्यासंबंधी आणि ती झोपणे अन् जागे रहाणे (Circadidian rhythm) यांचे संयम ठेवते. वनस्पती रात्री झोपतात.

१० आ ७. ‘रावेनाला’ (Ravenala) याला ‘ट्रॅव्हलर्स ट्री’ असे म्हणतात. ही वनस्पती ‘पाम ट्री’प्रमाणे असते; पण ही पाम ट्री नाही. या वनस्पतीची पाने पूर्व आणि पश्चिम दिशेने असतात. त्यामुळे सकाळ आणि संध्याकाळची पूर्ण किरणे यांवर पडतात.’

– डॉ. अजय जोशी (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.३.२०२०)

(क्रमशः)

उर्वरित भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/527339.html