साधनेच्या माध्यमातून साधकांना आनंद मिळवून देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘१२.२.२०१९ या दिवशी महर्षींच्या आज्ञेने रामनाथी आश्रमात गुरुपादुका प्रतिष्ठापना सोहळा झाला. त्या वेळी मला बैठक व्यवस्थेसंबंधी सेवा असल्याने तो कार्यक्रम मला सलग पहाता येत नव्हता आणि माझा भाव टिकून रहात नव्हता. तेव्हा मला अतिशय वाईट वाटल्याने मी श्रीकृष्णाला प्रार्थना केली, ‘देवा, माझ्यात भाव कधी निर्माण होणार ? माझी पात्रताच नाही का ?’ तेव्हा माझी आपोआपच भावजागृती होऊन श्रीकृष्णाने मला कृतज्ञतारूपी काव्य सुचवले, ते गुरुचरणी अर्पण करते.
परात्पर गुरु डॉ. आठवले, तुम्हीच आमचा श्वास ।
तुम्हीच आमची जगण्याची आस ॥
अन् तुम्हीच आम्हाला ।
ओढ लावली मोक्षप्राप्तीची ॥ १ ॥
कधीही न संपणारा ।
अमर्याद असा आनंद तुम्हीच देऊ जाणे ॥
आतापर्यंतच्या जीवन प्रवासात ।
तुम्ही काहीच पडू दिले नाही उणे ॥ २ ॥
कलियुगातला कृष्ण पहावयास ।
अमुचे नेत्र होते आतुरले ॥
आम्हास मोक्षाविना ।
अन्य काहीच नव्हते मागावयाचे ॥ ३ ॥
तुला पहाण्याची आस ।
तूच पूर्ण केलीस देवा ॥
एकच वाटे मनी आता ।
अखंड व्हावा तुझ्या चरणांचा धावा ॥ ४ ॥
स्वभावदोष अन् अहं त्यागणे ।
आहे माझ्या क्षमतेबाहेरचे ॥
तूच पहावे आता ।
तुझे लेकरू निर्मळ कसे होईल ॥ ५ ॥
तू दाखवलेल्या साधनापथावर ।
चालता येऊ दे समर्पित होऊनी ॥
मज अहं निर्मूलनाची प्रक्रिया ।
करता येऊ दे सातत्य ठेवूनी ॥ ६ ॥
तूच कल्पवृक्ष देवा ।
तूच कामधेनु ॥
तुझे अलौकिक देवत्व ।
शब्दांत मी कसे वर्णू ॥ ७ ॥
मन आता जिवाच्या आकांताने ।
धावत आहे तुझ्या चरणांपाशी ॥
देवा, तुझ्या उपकारांची ।
कशी होऊ मी उतराई ॥ ८ ॥’
– सौ. वैशाली देसाई, अंबरनाथ, जिल्हा ठाणे. (१२.२.२०१९)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |