ध्येय दिलेस देवा, तू गुरुस्मरणाचे ।

साधनेची विविध अंगे शिकवून साधकांना घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले

ध्येय दिलेस देवा (टीप १), तू गुरुस्मरणाचे ।
तुझ्या स्मरणातील आर्तभक्तीचे ।। १ ।।

ध्येय दिलेस देवा तू, अखंड तुला अनुभवण्याचे ।
तुला अनुभवता ‘स्व’ला विसरण्याचे ।। २ ।।

ध्येय दिलेस देवा, तू अष्टांग साधनेचे ।
साधना करून बंधनमुक्तीचे (टीप २) ।। ३ ।।

ध्येय दिलेस देवा, तू स्वभावदोष-निर्मूलनाचे ।
जन्मोजन्मीचे संस्कार नष्ट करण्याचे ।। ४ ।।

सौ. प्रतिभा फलफले

ध्येय दिलेस देवा, तू अहं-निर्मूलनाचे ।
अहं घालवून भावमय होण्याचे ।। ५ ।।

ध्येय दिलेस देवा, तू लहान होण्याचे ।
कमीपणा घेऊनी शिकण्याचे ।
तुझ्या चरणाचे धूलिकण होण्याचे ।। ६ ।।

ध्येय दिलेस देवा, तू नवविधा भक्तीचे ।
गुरुभक्तीने भगवंताला प्रसन्न करण्याचे ।। ७ ।।

ध्येय दिलेस देवा, तू भावमय होण्याचे ।
अखंड तुला अनुभवण्याचे ।। ८ ।।

ध्येय दिलेस देवा, तू गुणसंवर्धनाचे ।
गुणसंवर्धन करून आनंदी होण्याचे ।। ९ ।।

ध्येय दिलेस देवा, तू मनोलयाचे ।
अखंड तुझ्या आज्ञापालनाचे ।। १० ।।

ध्येय दिलेस देवा, तू आत्मनिवेदन भक्तीचे ।
आत्मनिवेदन करूनी प्रतिमा नष्ट करण्याचे ।। ११ ।।

ध्येय दिलेस देवा, मन निर्मळ करण्याचे ।
मनमंदिरात तुला अनुभवण्याचे ।। १२ ।।

ध्येय दिलेस देवा, तू अखंड गुरुसेवेचे ।
गुरुसेवेतून गुरुभक्ती करण्याचे ।। १३ ।।

ध्येय दिलेस देवा, तू संघभावाचे ।
संघभावातून व्यापक होण्याचे ।। १४ ।।

ध्येय दिलेस देवा, तू शरणागतीचे ।
अखंड तुझा धावा करण्याचे ।। १५ ।।

ध्येय दिलेस देवा, तू तुझे मन जिंकायचे ।
केवळ तुला आवडेल असेच करण्याचे ।। १६ ।।

ध्येय दिलेस देवा, तू कृतज्ञताभावाचे ।
तुझी कृपा अनुभवण्याचे ।
केवळ तुझी कृपा अनुभवण्याचे ।। १७ ।।

भगवंता, ध्येय देणारा तूच आहेस ।
ध्येयरूपी शब्द सुचवणारा तूच आहेस ।
त्याची जाणीव ठेवणारा तूच आहेस ।
कर्ता-करविता तू असूनही नामानिराळा तूच आहेस ।। १८ ।।

टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले

टीप २ – जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होण्याचे

– सौ. प्रतिभा फलफले, पुणे (४.४.२०२०)