कर्नाटक सरकारकडून ‘मुंबई कर्नाटक’ भागाचे ‘कित्तूर कर्नाटक’ असे नामकरण !

बेळगाव – स्वातंत्र्यपूर्व काळात बेळगाव, कारवार, धारवाड आणि विजापूर हे भाग मुंबई प्रांतात होते. स्वातंत्र्यानंतर आणि वर्ष १९७३ मध्ये कर्नाटक राज्याची निर्मिती झाल्यानंतरही या भागांची ओळख ‘मुंबई कर्नाटक’ म्हणूनच होती. ही ओळख आता कर्नाटक सरकारकडून पुसून टाकण्यात आली असून ‘मुंबई कर्नाटक’ या भागाचे ‘कित्तूर कर्नाटक’, असे नामकरण करण्यात आले आहे. नामांतर करण्याविषयी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कर्नाटक सरकारने ही घोषणा केली.

याअगोदर कर्नाटक सरकारने ‘हैद्राबाद कर्नाटक’चे नामांतर ‘कल्याणा कर्नाटक’ असे केले आहे.