१. ईश्वरी दृष्टीने जाती समान असल्याने सर्व जातीतून संत निर्माण होणे : ‘मानवाने केलेल्या पाप-पुण्यानुसार त्याला मनुष्यजन्माची प्राप्ती झाली आहे. कर्मानुसार जाती पडलेल्या आहेत. जाती-जातींमध्ये अज्ञानामुळे भेद मानला जातो. ईश्वराच्या दृष्टीने जाती समान आहेत; म्हणूनच आध्यात्मिक प्रगती करून सर्व जातींतून संत निर्माण झाले आहेत.
२. अज्ञानी मानव ठराविक जातीला आरक्षण देतो, हे नियतीच्या, ईश्वरी इच्छेच्या विरुद्ध आहे. जगत्कल्याणासाठी भारतानेच नव्हे, तर सर्व जगाने ‘ज्यांच्या अंगी ईश्वरी गुण आहेत’, अशांनाच आरक्षण द्यावे, म्हणजे राज्यकारभार आदर्श स्वरूपाचा चालेल.’
– श्री. नाना उपाख्य विजय विष्णु वर्तक, नागोठणे, रायगड. (१९.८.२०२१)