पर्वरी, गोवा येथील सनातनचे साधक श्री. सुधीर गांवस यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

श्री. सुधीर गांवस

१. सतत आनंदी असणे

श्री. सुधीरदादा नेहमी हसतमुख असतात. त्यांना आध्यात्मिक त्रास आहे; पण सतत आनंदी राहिल्याने त्यांना त्रासाची तीव्रता अधिक वाटत नाही. त्यांच्याशी बोलतांना चांगले वाटते.

२. ‘त्यांचा नामजप अंतर्मनातून चालू असतो’, असे वाटते.

३. शिकण्याच्या स्थितीत असणे

श्री. सुधीर गांवसदादा पूर्वी आढाव्याच्या वेळी झोपत असत; पण एक दिवस आढावासेविकेने त्यांना कठोर शब्दांत त्याची जाणीव करून देऊन आढाव्यात न झोपण्याविषयी सांगितले. तेव्हापासून ते कितीही झोप आली, तरी प्रयत्न करून तिच्यावर मात करण्याचा प्रयत्न करतात. ‘जेव्हा आपण शिकण्याच्या स्थितीत असतो, तेव्हा आपल्याला त्रासावरही मात करता येते’, हे यावरून माझ्या लक्षात आले.

४. श्री. सुधीरदादांमध्ये पुष्कळ प्रेमभाव आहे. ते दुसर्‍यांच्या साहाय्यासाठी नेहमी तत्पर असतात.

५. श्री. सुधीरदादांमध्ये पुष्कळ नम्रता आहे.

६. श्री. सुधीरदादा बोलतांना वातावरणात सुगंध पसरणे

एकदा रामनाथी आश्रमात एका संतांच्या भेटीच्या वेळी श्री. सुधीरदादा बोलत असतांना त्यांच्या बोलण्यामुळे वातावरणात सुगंध पसरला होता. तिथे उपस्थित इतर साधकांनाही हे जाणवले. तेव्हा ‘त्यांनी पृथ्वीतत्त्वाला जिंकले आहे; म्हणून वातावरणात सुगंध पसरला आहे’, असे संतांनी सांगितले.

– एक साधिका  (१७.११.२०१८)