‘दीपावली म्हणजे १४ वर्षांचा वनवास पूर्ण करून आणि रावणाचा वध करून अयोध्येला परतलेल्या प्रभु श्रीरामचंद्राचा स्वागतोत्सव ! अयोध्यावासियांनी श्रीरामाच्या आगमनाप्रीत्यर्थ दारोदारी गुढ्या-तोरणे उभारली आणि अत्यंत आनंदाने दीपोत्सव साजरा केला. ‘विजयपताका श्रीरामाची झळकते अंबरी ।’, हे त्या सुंदर क्षणांची अनुभूती देणारे गीत आहे. एकदा हे गीत ऐकत असतांना श्रीरामस्वरूप गुरुदेवांची आठवण येऊन पुढील ओळी सुचल्या. श्रीरामाप्रमाणे श्रीरामस्वरूप गुरुदेवही पृथ्वीवर पुन्हा एकदा रामराज्य म्हणजे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी अवतरले आहेत. श्रीरामस्वरूप गुरुदेवांच्या कोमल चरणी या वर्षीच्या दीपावलीनिमित्त या भक्तीओळी कोटीशः कृतज्ञतेच्या भावाने समर्पित करत आहोत.
विजयपताका गुरुदेवांची । झळकते अंबरी ।।
प्रभु आले अंतरी । प्रभु आले अंतरी ।। धृ.।।
भावाश्रूंनी नयन हे भिजले । सत्त्वगुणाचे पुष्प वाहिले ।।
गुरुभक्तीचा गंध दरवळे । श्रद्धा तोरणे मनोमनी गं मनोमनी ।। १ ।।
आला राजा मम मनाचा (टीप १) । सडा शिंपला चैतन्याचा ।।
मन हे गाते भावस्वरी । आरती ओवाळिते मनद्वारी ।। २ ।।
गुरुदेवांचा गजर होऊनी । पावन मम मन झुकते चरणी ।।
मन रंगले गुणगायनी । हिंदु राष्ट्राची ललकारी गं ललकारी ।। ३ ।।
टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले
– सौ. सायली करंदीकर (वय २५ वर्षे) आणि कु. वैष्णवी वेसणेकर (वय २१ वर्षे, ६५ टक्के आध्यात्मिक पातळी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.१०.२०२१)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |