५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला वणी (जिल्हा यवतमाळ) येथील चि. समर्थ अमित काळे (वय १ वर्ष) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. समर्थ अमित काळे हा या पिढीतील एक आहे !

भाद्रपद पौर्णिमा (२०.९.२०२१) या दिवशी वणी (जिल्हा यवतमाळ) येथील चि. समर्थ अमित काळे याचा पहिला वाढदिवस झाला. त्यानिमित्त वणी येथे रहाणारे त्याचे आई-वडील आणि आजी यांना जाणवलेली समर्थची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चि. समर्थ अमित काळे

१. गरोदरपण

अ. ‘गरोदरपणी मी रामरक्षा आणि मारुतिस्तोत्र म्हणायचे, तसेच नामजप अन् ग्रंथांचे वाचन करायचे. त्या वेळी मला चांगले वाटायचे.

आ. पोटावर हात ठेवून नामजप करतांना बाळाची हालचाल होऊन मला आनंद मिळायचा.’

– सौ. रीता अमित काळे (चि. समर्थची आई)

श्री. अमित काळे

२. जन्मानंतर

२ अ. ‘बाळाच्या जन्मानंतर १५ दिवसांनी आधुनिक वैद्यांनी सांगितलेला साबण वापरल्यावर बाळाला घामोळे येऊ लागले आणि सनातनचे ‘पंचामृत’ हे साबण वापरल्यावर बाळाला घामोळे येणे बंद झाले.

२ आ. चार मास – कोरोनाच्या विरोधात आध्यात्मिक बळ मिळावे म्हणून करावयाचा ‘श्री दुर्गा, दत्त आणि शिव’ यांचा नामजप ऐकतांना जप संपेपर्यंत चि. समर्थ जागा असायचा.

(‘कोरोनाच्या विरोधात आध्यात्मिक बळ मिळावे म्हणून साधक ‘श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री गुरुदेव दत्त – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – ॐ नमः शिवाय । असा नामजप प्रतिदिन १०८ वेळा करतात.’ – संकलक)

२ इ. वय – ७ ते ९ मास

२ इ १. देवपूजेची ओढ : चि. समर्थला देवपूजेची ओढ आहे. देवाजवळ उदबत्ती लावतांना त्याला पुष्कळ आनंद होतो.

२ इ २. समर्थला गाय पुष्कळ आवडते. गायही त्याच्याजवळ जाऊन त्याला चाटायची. त्या वेळी तो मुळीच घाबरायचा नाही.

२ इ ३. इतर मुले आकर्षित होणे : आमच्या घराला लागूनच एक मंदिर आहे. तेथे अनेक मुले येतात. ती मुले नेहमी समर्थची आठवण काढतात. यावरून ‘इतर मुले त्याच्याकडे आकर्षित होतात’, असे वाटते.’

– सौ. रीता आणि श्री. अमित काळे (चि. समर्थचे आई-वडील)

सौ. रीता काळे

२ ई. वय – १० ते ११ मास

१. समर्थ १० मासांचा झाल्यावर चालायला लागला.

२. समर्थच्या हसण्यात चैतन्य जाणवते. त्याच्याकडे पाहिल्यावर शांत वाटते आणि मनातील अस्वस्थता दूर होते.

३. तो इतरांशी जवळीक साधायचा प्रयत्न करतो.

४. तो झोपतांना भजने ऐकल्याविना झोपत नाही. ‘अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं…।’ हे त्याच्या आवडीचे भजन आहे. ते ऐकल्यावर तो झोपी जातो.

सौ. बेबीताई काळे

३. स्वभावदोष

हट्टीपणा आणि चिडचिड करणे.’

– सौ. बेबीताई अनंत काळे (चि. समर्थची आजी (वडिलांची आई))

अनुभूती

टंकलेखन करतांना प्रसन्न वाटून भावजागृती होणे

‘चि. समर्थच्या गुणवैशिष्ट्यांचे टंकलेखन करतांना मला उत्साह जाणवत होता. माझ्या डोक्याभोवती चांगल्या संवेदना जाणवून मला प्रसन्न वाटत होते. काही वेळा माझी भावजागृतीही होत होती.’ – श्री. लहू खामणकर, वणी, यवतमाळ.

(या लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक ६.९.२०२१)