केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळी हिंदूंना सल्ले देणारी अशी आस्थापने अन्य धर्मियांना त्यांच्या सणांच्या वेळी असे सल्ले का देत नाहीत ? – संपादक |
नवी देहली – फर्निचरची विक्री करणार्या ‘पेपरफ्राय’ या आस्थापनाने हिंदूंना ‘दिवाळीत फटाके न फोडता घरीच पत्ते खेळा’, असा संतापजनक सल्ला दिला आहे. त्यास हिंदूंनीही सडेतोड प्रत्युतर देत ‘आम्ही दिवाळीला दीप लावून फटाके फोडणार आहोत’, अशा शब्दांत या आस्थापनाची कानउघाडणी केली.
१. ‘पेपरफ्राय’ने सामाजिक माध्यमांद्वारे एक छायाचित्र प्रसारित केले आहे. त्यामध्ये घरातील सर्व सदस्य कुटुंबातच पत्ते खेळत असून एक महिला गिटार हे वाद्य वाजवत असल्याचे दाखवण्यात आले आहे.
२. यावर दूरदर्शनचे ज्येष्ठ पत्रकार अशोक श्रीवास्तव यांनी ‘फटाके फोडू नका, जुगार खेळा, दिवाळीनिमित्त नवीन सेक्युलर अभियान !’, अशा शब्दांत टीका केली.
३. काहींनी ‘पेपरफ्राय’ला ‘ते ईद आणि मोहरम् या सणांच्या वेळीही मुसलमानांना ‘घराबाहेर पडू नका आणि घरातच बसून पत्ते खेळा’, असा सल्ला देतात का ?’, असा प्रश्न विचारला.
४. काहींनी अशा आस्थापनांवर ‘हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी सरकारने कठोर कारवाई करावी’, अशी मागणी केली आहे.
५. एकाने प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, ‘आता जुगार आला आहे, नंतर मद्याची बाटली उघडण्याचा सल्ला देण्यात येईल.’