कोल्हापूर, ५ नोव्हेंबर (वार्ता.) – राज्यातील इतर सर्व मंदिरे कोरोना संसर्गाचे सर्व नियम पाळून पूर्ण क्षमतेने खुली झाली आहेत. असे असतांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत येणारी श्री महालक्ष्मी मंदिर आणि जोतिबा मंदिर येथे मात्र अद्यापही भाविकांना दर्शनासाठी ‘ई’ पासची सक्ती आहे. तरी ‘ई’ पास रहित करून भक्तांना मंदिरात प्रवेश खुला करण्यासाठी भाजपाच्या वतीने ३ नोव्हेंबर या दिवशी महाद्वार चौक येथे जागर आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, गणेश देसाई, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, राजू मोरे, चंद्रकांत घाटगे, अजित सूर्यवंशी यांसह अन्य भाजप पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.