श्रीलंकेने चीनकडून मागवलेले जैविक खत विषारी असल्याने चीनला परत पाठवले !

( सौजन्य: WION NEWS )

कोलंबो (श्रीलंका) – जैविक खतांच्या खरेदीवरून चीन आणि श्रीलंका यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. चीनमधील खते हानीकारक असल्याने श्रीलंकेने ती परत चीनला पाठवून दिली आहेत. ‘हे खत विषारी आहे’, असे श्रीलंकेने चाचणी केल्यानंतर म्हटले आहे.

यानंतर चीनने या खताचे उत्पादन करणार्‍या त्याच्या आस्थापनाला तपासणी करण्याचा आदेश दिला आहे. श्रीलंकेने आता भारताकडून जैविक खत मागवण्यास प्रारंभ केला आहे.