काबुलमधील बाँबस्फोटात तालिबानचा कमांडर हमदुल्लाह मुखलिस याच्यासह २५ जणांचा मृत्यू

इस्लामिक स्टेटने घेतले आक्रमणाचे दायित्व !

जेथे धर्मांध बहुसंख्य असतात, तेथे ते एकमेकांना ठार मारतात !

तालिबानचा कमांडर मौलवी हमदुल्लाह मुखलिस

काबुल (अफगाणिस्तान) – येथे सैन्य रुग्णालयाजवळ झालेला आत्मघाती बाँबस्फोट आणि गोळीबार यांमध्ये २५ जणांचा मृत्यू झाला, तर ५० जण घायाळ झाले. ठार झालेल्यांमध्ये तालिबानचा कमांडर मौलवी हमदुल्लाह मुखलिस याचा समावेश आहे. या आक्रमणाचे दायित्व ‘इस्लामिक स्टेट’ने स्वीकारले आहे.

काबुलमधीलच १५ व्या जिल्हा रुग्णालयातही अशाच प्रकारे आतंकवादी आक्रमण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या वेळी तालिबान आणि इस्लामिक स्टेट या दोन्ही आतंकवादी संघटनांच्या चकमकीत इस्लामिक स्टेटचे ४ आतंकवादी ठार झाले.