उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. जय अमोल बोडरे हा एक आहे !
(‘वर्ष २०१७ मध्ये कु. जयची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती.’ – संकलक)
‘४.२.२०२१ या दिवशी कु. जय आणि त्याची आई सौ. ज्योती बोडरे (माझी मुलगी) अन् त्याचा छोटा भाऊ चि. विजय (वय ३ वर्षे, आध्यात्मिक पातळी ५१ टक्के) काही दिवसांसाठी देवद येथील सनातनच्या आश्रमात रहायला आले होते. या दिवसांमध्ये त्याच्या आजी-आजोबांना कु. जयमध्ये पूर्वीच्या तुलनेत बराच पालट झालेला दिसून आला. त्याच्यात सेवेची तळमळ आणि आश्रमात रहायला येण्याविषयीची ओढ विशेष दिसून आली. त्याची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. श्री. शिवाजी लक्ष्मण चव्हाण, (कु. जयचे आजोबा, आईचे वडील), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
१ अ. प्रेमळ आणि लाघवी
‘कु. जयने आश्रमातील साधकांशी प्रेमाने बोलून त्यांना आपलेसे केले. तो साधकांना सेवेत साहाय्य करत असे. तो सर्वांना आवडतो. आश्रमातील सर्व वाहनांची त्याने माहिती करून घेतली आहे.
१ आ. स्वयंशिस्त
जय प्रतिदिन सकाळी ६ वाजता उठून १ घंटा व्यायाम करतो. तो स्वतःची सर्व कामे स्वतः करतो. तो घरातील सर्व कामांत त्याच्या आईला साहाय्य करतो. त्याचा लहान भाऊ चि. विजयलाही तो चांगले सांभाळतो.
१ इ. समजूतदारपणा
त्याची आई विजयवरून त्याला रागावली, तरी न्यूनपणा घेऊन तो त्याला खेळवतो. त्याने मागितलेल्या वस्तू त्याला लगेच देतो. तो घरी आलेल्या पाहुण्यांनाही लगेच आपलेसे करून घेतो. त्याला कधी कुणी रागावल्याचे वाईट वाटत नाही. त्याचे आजी-आजोबा त्याला रागावले, तरी तो त्यांच्याशी प्रेमानेच बोलतो.
१ ई. आकलनक्षमता चांगली असणे
त्याची आकलनक्षमता पुष्कळ अधिक आहे. एखादी सेवा त्याला सांगितल्यावर पुन्हा ती सांगावी लागत नव्हती.
१ उ. शिकण्याची वृत्ती असणे
सेवा करतांना त्याच्या मनात आलेल्या शंका तो लगेच विचारून शंकांचे समाधान करून घेतो. त्याची शिकण्याची वृत्ती त्याच्या शंकांमधून दिसून येते.
१ ऊ. आश्रमातील सर्व कार्यपद्धती समजून घेऊन त्याप्रमाणे तो योग्य प्रकारे कृती करत होता.
१ ए. त्याची जेवणाविषयी आवड-निवड नाही. जे पानात असेल, ते तो आवडीने खातो. कुठल्याही गोष्टीचा तो हट्ट करत नाही.
१ ऐ. व्यष्टी साधनेप्रती गांभीर्य असणे
जय चिंतनसारणीप्रमाणे आढावा लिहून देतो. त्याची आजी सौ. संगीता चव्हाण यांच्याकडून त्याने ‘चुका कशा लिहायच्या ? स्वयंसूचनांची सत्रे कशी करायची ? भावजागृतीचे प्रयत्न कसे करायचे ?’, हे सर्व शिकून घेतले आहे. त्याप्रमाणे तो त्याच्या आजीला प्रतिदिन आढावाही देतो.
१ ओ. कृतज्ञता
एक मासानंतर घरी जाण्यास निघाल्यावर त्याचे पाय आणि अंतःकरण जड झाले होते अन् मनही दुःखी झाले होते. देवाने एक मास जयकडून आश्रमात राहून सेवा करवून घेतली, त्यासाठी देवाच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
२. सौ. संगीता चव्हाण (कु. जयची आजी, आईची आई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२ अ. आनंदी
जय दिवसभर आनंदी असतो. त्याच्याशी बोलतांना आणि खेळतांना पुष्कळ आनंद जाणवतो.
२ आ. व्यवस्थितपणा
जयला त्याच्या लहान भावाला (कु. विजय) सांभाळण्यास सांगितल्यावर तो त्याला खेळणी घेऊन खेळवतो. विजय झोपला की, त्याची सर्व खेळणी तो व्यवस्थितपणे मांडणीमध्ये ठेवतो आणि नंतरच खेळायला जातो.
२ इ. इतरांना साहाय्य करणे
तो शाळेमध्ये त्याच्या मित्रांना ‘काही साहाय्य हवे आहे का ?’, हे स्वतःहून विचारतो. त्याच्याकडील एखादी वस्तू त्यांना हवी असल्यास तो ती लगेच देतो. तो त्याच्या आईला स्वयंपाक करतांना साहाय्य करतो. त्याच्या लहान भावाने त्याच्याकडे असलेली एखादी वस्तू मागितली, तर तो ती वस्तू लगेच त्याला देतो.
२ ई. जयला झोपतांना क्रांतीकारकांच्या, तसेच शूर पराक्रमी वीरांच्या गोष्टी ऐकायला आवडतात.
२ उ. संताप्रती भाव
तो रामनाथी आश्रमात आला असतांना आम्हाला एका सत्संगात त्याला संतांनी विचारले, ‘‘तुला काही विचारायचे आहे का ?’’ त्यावर त्याने सांगितले, ‘‘मला काही विचारायचे नसून मला केवळ तुम्हाला नमस्कार करायचा आहे.’’
२ ऊ. कु. जयमधील स्वभावदोष
धांदरटपणा, आळस, मोठ्याने बोलणे.
२ ए. कृतज्ञता
गुरुमाऊलींच्या कृपेनेच अशा दैवी बालकाचा सहवास मिळाला, त्यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’ (२२.३.२०२१)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता |