६८ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या पुणे येथील साधिका ‘सौ. मनीषा पाठक’ यांच्या नावाचा साधिकेला सुचलेला भावार्थ !

सौ. मनीषा पाठक

नमस्कार ताई,

देवाच्या कृपेने माझ्या मनात तुझ्याप्रती फारच भाव दाटून आला. त्यामुळे देवाने मला ‘मनीषा पाठक’ या नावाचा माझ्या मनात असलेला भाव सांगितला.

म – मनातील इच्छा निस्तेज झालेल्यांना

नि – निर्भय करून

षा – शाश्वत करून

पा – पाठपुरावा घेणारी

सौ. कमल कुटे

ठ – ठणकावून सांगण्यात अतीव प्रेम असणारी

क – कणाकणांत गुरुरूप पाहून ‘मोक्षाला कसे जायचे ?’, ते कृतीतून शिकवून कृतीप्रवण करणारी ‘मनीषाताई’ नसून ती माझ्या मनातील इच्छा पूर्ण करणारी ‘मनीषाआई’ आहे.

ज्या गुरुमाऊलींनी या आईला घडवले, त्या गुरुमाऊलीला शरण जाऊन कृतज्ञतारूपी हे पुष्प अर्पण करते.

– सौ. कमल कुटे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.१.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक