पू. (सौ.) योया वाले यांची संत आणि कुटुंबीय यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये !

पू. (सौ.) योया वाले यांच्यात दैवी पवित्रता आहे ! – पू. (सौ.) भावना शिंदे, अमेरिका

पू. (सौ.) योया यांनी मी सांगितलेले सर्वकाही एका शिष्याप्रमाणे ऐकले. त्यांच्यामध्ये भाव, तळमळ आणि क्षात्रवृत्ती हे गुण आहेत. त्यांच्यामध्ये दैवी पवित्रता  आणि प्रेमभाव आहे. तो मला शिकायला मिळाला. पूर्वी त्या सतत सद्गुरु दादांचे (सद्गुरु सिरियाक वाले यांचे) साहाय्य घ्यायच्या. त्यांच्या मनात त्रासामुळे नकारात्मक विचार यायचे; पण नेहमी त्यांनी साधनेसाठी योग्य तोच मार्ग पत्करला. त्या काढत असलेल्या सूक्ष्मचित्रांमध्ये पूर्ण ज्ञान आणि स्पष्टता असते. ‘सहस्र शब्दांतून जे सांगायचे, ते एका चित्रातून सांगता येते’, याप्रमाणे त्यांची सूक्ष्मचित्रे असतात.

पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर, अमेरिका – पू. (सौ.) योया वाले यांचा पूर्ण परिवारच समष्टी कार्य करत आहे.

आध्यात्मिक त्रास वाढूनही पू. (सौ.) योया वाले यांनी त्या परिस्थितीवर चिकाटीने मात केली ! – पू. देयान ग्लेश्चिच (पू. योया वाले यांचे भाऊ)

पू. (सौ.) योया वाले यांची निरीक्षणक्षमता चांगली आहे. मला तिच्यामुळे व्यष्टी साधनेत साहाय्य झाले. आध्यात्मिक त्रास वाढल्यामुळे तिला २ वर्षे पुष्कळ कठीण गेली; परंतु तिने त्या परिस्थितीवर चिकाटीने मात केली. तिच्यामध्ये पुष्कळ प्रांजळपणा आहे. तिच्याकडे सूक्ष्मचित्रांकनाची पुष्कळ मोठी सेवा आहे; पण तिला त्याचा अहंकार नाही. सूक्ष्मचित्र पूर्ण होण्याआधी ‘आणखी काय करायला हवे ?’, याचा ती विचार करते. तिच्यात जिज्ञासा आणि शिकण्याची वृत्ती आहे.

श्रीमती द्रगाना किस्लोव्हस्की (पू. (सौ.) योया यांची आई) – पू. (सौ.) योयामध्ये पुष्कळ आध्यात्मिक बळ आहे. तिने संतपद गाठणे, ही गुरुकृपाच आहे.