पालघर येथील लाचखोर पशूसंवर्धन अधिकारी कह्यात 

भ्रष्टाचारात बुडलेले प्रशासन देशाला महासत्ता कसे बनवणार ?

(प्रतिकात्मक छायाचित्र)

ठाणे, ३० ऑक्टोबर (वार्ता.) – एका पशूवैद्यकीय अधिकार्‍यांचे स्थानांतर झाल्यावर त्यांना कार्यमुक्त आणि पदभारमुक्त करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील वर्ग १ चे पशूसंवर्धन अधिकारी संजीत धामणकर (वय ४८ वर्षे) यांनी त्यांच्याजवळ २० सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या लाचेच्या रकमेपैकी १० सहस्र रुपयांचा पहिला हप्ता घेतांना पालघर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने धामणकर यांना सापळा रचून कह्यात घेतले आहे. (अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा करायला हवी ! – संपादक)