हलालमुक्त दिवाळी साजरी करा ! – श्री. प्रमोद मुतालिक, राष्ट्रीय अध्यक्ष, श्रीराम सेना

हिंदु जनजागृती समितीचे ‘हलाल मुक्त दिवाळी’ अभियान

डावीकडून श्री. अण्णप्पा दीवटगी, श्री. रमेश शिंदे, श्री. प्रमोद मुतालिक, श्री. गुरुप्रसाद गौडा आणि श्री. मंजु काटकर

हुब्बळ्ळी (कर्नाटक) – आज केवळ १५ ते २० टक्के असलेल्या मुसलमानांसाठी बहुसंख्यांक हिंदूंवर हलालप्रमाणित उत्पादने खाण्याची वेळ ओढवली आहे. हे एक मोठे षड्यंत्र आहे. हलाल आणि हिंदू यांचा काहीही संबंध नाही. केवळ मांसापुरते मर्यादित असलेल्या हलालने आज सर्व उत्पादनांना व्यापून टाकले आहे. राष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील हे धोकादायक आहे. त्यासाठी हलालप्रमाणित उत्पादनांवर बहिष्कार घालून हलालमुक्त दीपावली साजरी करूया, असे आवाहन श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी येथे केले.

२९ ऑक्टोबर या दिवशी येथे हिंदु जनजागृती समितीच्या ‘हलाल मुक्त दिवाळी’ अभियानाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, श्रीराम सेनेचे हुब्बळ्ळी जिल्हा प्रमुख श्री. अण्णप्पा दीवटगी, श्री. मंजु काटकर आणि हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा उपस्थित होते.