दिवाळीमध्ये हलाल प्रमाणित उत्पादनांवर बहिष्कार घालण्याच्या मागणीसाठी ट्विटरवर ट्रेंड !

#Halal_Free_Diwali  हा हॅशटॅग राष्ट्रीय ट्रेंडमध्ये तृतीय स्थानी

मुंबई – दीपावलीमध्ये विविध खाद्यपदार्थ आणि वस्तू यांची खरेदी करतांना हलाल प्रमाणपत्रांविषयी जागृती करण्यासाठी २८ ऑक्टोबर या दिवशी ट्विटरवर  #Halal_Free_Diwali हा हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला होता. काही वेळातच तो तिसर्‍या क्रमांकावर होता. त्यावर ३० सहस्र ट्वीट्स करण्यात आले. याद्वारे हलाल प्रमाणपत्र असणार्‍या उत्पादनांवर बहिष्कार घालून ‘हलाल मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले.