महासिद्धगुरु तोडकर महाराज देवस्थान सेवा संस्थान यांच्या वतीने रथोत्सव आणि पालखी सोहळा !

श्री क्षेत्र अमृतनगर (जिल्हा कोल्हापूर) – प्रतिवर्षीप्रमाणे नुकतेच महासिद्धगुरु तोडकर महाराज देवस्थान सेवा संस्थान यांच्या वतीने रथोत्सव आणि पालखी सोहळा पार पडला. हा सोहळा सकाळी १० वाजता शिवपार्वती मंदिर येथून प्रारंभ होऊन दुपारी १२ वाजता आश्रमात पोचला. यानंतर रुद्राभिषेक पार पडला. शेवटी सद्गुरु तोडकर महाराज यांची आरती करून महाप्रसाद वाटप करून सोहळ्याची सांगता झाली. या सोहळ्यासाठी ऐतवडे, चिकुर्डे, कोडोली, पोखले, वारणानगर, पारगाव येथील भाविक उपस्थित होते.