हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुडुचरी येथील ‘कलारीग्राम’ संस्थेसाठी विशेष ‘ऑनलाईन’ सत्संगाचे आयोजन

पू. (सौ.) उमा रविचंद्रन्

चेन्नई – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १३ ऑक्टोबर या दिवशी पुडुचेरीमधील ‘कलारीग्राम’ या संस्थेसाठी धर्मशिक्षणविषयक एका विशेष ‘ऑनलाईन’ सत्संगाचे इंग्रजी भाषेमध्ये आयोजन करण्यात आले होते. या वेळी समितीच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या सत्संगाला चांगला प्रतिसाद मिळाला. या सत्संगाचे आयोजन कलारीग्राम येथील सौ. दीपा यांनी केले होते. सौ. दीपा यांनी सांगितले की, हा सत्संग अतिशय चांगला झाला. या सत्संगाची माहिती विशेषत: तरुण पिढीसाठी अतिशय उपयुक्त ठरेल.