देगलूर-बिलोली मतदारसंघ पोटनिवडणूक
नांदेड – ‘महाराष्ट्रात ज्या पद्धतीने हिंदूंवर अत्याचार होत आहेत, ते पहाता देगलूर-बिलोली मतदारसंघ पोटनिवडणूक ‘हिंदू विरुद्ध मुसलमान’ अशी झाली आहे. मुंबई, मालाड, मालवणी आणि धाराशिव येथे झालेल्या दंगलीत हिंदूंवर अत्याचार झाले आहेत. ही निवडणूक औरंगजेब विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात आहे’, असे वक्तव्य नितेश राणे यांनी येथे केले. जिल्ह्यातील देगलूर-बिलोली मतदारसंघ पोटनिवडणूक प्रचारार्थ देगलूर तालुक्यात आले असता ते बोलत होते. नितेश राणे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात ज्या पद्धतीने हिंदू-मुसलमान यांच्यात वाद होत आहेत, त्याला महाविकास आघाडी सरकार उत्तरदायी आहे. भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांना विजयी करा, असे आवाहन करत त्यांनी महाविकास आघाडीवर तोफ डागली.