पाकिस्तानच्या विजयानंतर देशातील काही मुसलमानबहुल भागांमध्ये फोडण्यात आले फटाके !

दिवाळीमध्ये फटाके फोडण्यावर बंदी; मात्र पाकच्या विजयानंतर ते फोडलेले चालते, हा दुटप्पीपणा का ? – माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग

‘भारत इस्लामी देश होण्याच्या मार्गावर चालला आहे’, हे जन्महिंदूंच्या आतातरी लक्षात येईल का ? आतातरी ते हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध होतील का ? कि जे बांगलादेशमध्ये नवरात्रीत झाले, ती स्थिती येण्याची ते वाट पहात आहेत ? – संपादक

(डावीकडे) फटाके फोडताना धर्मांध (उजवीकडे) माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग

नवी देहली – देशात काश्मीरमध्ये, देहलीतील सीमापुरी, उत्तरप्रदेशातील सहारनपूर आदी मुसलमानबहुल भागांमध्ये पाकने टी-२० क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेतील सामन्यामध्ये भारताला पराभूत केल्यानंतर फटाके फोडण्यात आले. ‘दिवाळीमध्ये फटाक्यांवर प्रतिबंध घातला जातो; मात्र २४ ऑक्टोबरला रात्री भारताच्या अनेक भागांमध्ये पाकिस्तानच्या विजयाच्या निमित्ताने फटाके फोडण्यात आले. अच्छा, ते लोक ‘क्रिकेटच्या विजया’चाआनंद  साजरा करत होते ! असे आहे, तर दिवाळीमध्ये फटाके फोडण्यात काय हानी आहे ? हा दुटप्पीपणा कशाला ? सर्व ज्ञान दिवाळीच्या वेळेस कसे आठवते ?’, अशा शब्दांत भारताचे माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यांनी ट्वीट करून धर्मांधांच्या या कृत्यावर टीका केली.

१. सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता शशांक शेखर झा यांनी देहलीतील मुसलमानबहुल सीमापुरी भागातील धर्मांधांकडून फटाके फोडण्यात आल्याचा व्हिडिओ देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना टॅग करत, ‘जर तुमच्या सरकारने दिवाळीच्या वेळी फटाके फोडण्यास हिंदूंना विरोध केला, तर आपली भेट थेट न्यायालयात होईल’, अशी चेतावणी दिली आहे.

२. दूरदर्शनचे पत्रकार अशोक श्रीवास्तव यांनी या व्हिडिओ ट्वीट करतांना म्हटले, ‘जे कधी काश्मीरमध्ये होत होते, ते आता देहलीमध्ये होत आहे. दिवाळीमध्ये हिंदू फटाके फोडू शकत नाहीत; मात्र पाकिस्तानसाठी मुसलमान फटाके फोडू शकतात.’