(म्हणे) ‘विजयासाठी भारतातील मुसलमानांच्या प्रार्थनाही पाठीशी होत्या !’

भारत-पाक क्रिकेट सामन्यात पाकच्या विजयावर पाकचे गृहमंत्री शेख रशिद यांचे विधान !

  • याविषयी भारतातील मुसलमान संघटना आणि धार्मिक नेते गप्प का आहेत ? कि शेख रशिद यांनी जे म्हटले ते योग्य आहे, असेच त्यांना सांगायचे आहे ? – संपादक
  • जर शेख रशिद जे सांगत आहेत, ते सत्य असेल, तर भारताची दुसरी फाळणी होण्याची आणि त्यासाठी पुन्हा एकदा हिंसाचार घडवण्यात येण्याचीच शक्यता आहे. हे पहाता सरकार, तसेच हिंदू अन् त्यांच्या संघटना कधी जाग्या होणार ? – संपादक
  • भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा सामना म्हणजे ‘हिंदु विरुद्ध मुसलमान’ असे युद्ध असल्याचेच पाकच्या गृहमंत्र्यांना सुचवायचे आहे, हे लक्षात घ्या ! यातूनच त्यांची धर्मांध मानसिकता स्पष्ट होते. – संपादक
उजवीकडे पाकचे गृहमंत्री शेख रशीद अहमद

इस्लामाबाद (पाकिस्तान) – ‘पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचे अभिनंदन आणि शुभेच्छा ! ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या संघाने भारताला मात दिली, त्याला मी सलाम करतो. हा इस्लामी जनतेचा विजय आहे. पाकिस्तानी संघ आणि मुसलमान बांधव यांनाही शुभेच्छा ! भारतातील मुसलमान बांधवांच्या प्रार्थनाही पाकिस्तानच्या संघाच्या समवेत होत्या. केवळ भारतातीलच नाही, तर जगभरातील मुसलमान बांधव पाकिस्तानी संघाच्या पाठीशी होते’, असे विधान पाकचे गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ ट्वीट करत केले आहे. २४ ऑक्टोबर या दिवशी दुबई येथे खेळल्या गेलेल्या टी-२० विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि पाक संघातील सामन्यात पाकचा १० गडी राखून विजय झाल्यावर त्यांनी हे विधान केले.