गंभीर अपघात झाल्याने देहलीतील एका रुग्णालयात भरती झालेले श्री. आकाश गोस्वामी यांनी ‘सनातन चैतन्यवाणी ॲप’वरील विषय ऐकून दत्ताचा नामजप चालू करणे

‘मी हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाला भेट देणारे श्री. आकाश गोस्वामी यांना मी संपर्क केला. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘मला गंभीर अपघात होऊन माझ्या गुडघ्याचे हाड मोडले आहे. त्यावरील शस्त्रकर्म करून घेण्यासाठी मी देहलीतील एका रुग्णालयात भरती झालो आहे.’’ मी त्यांना त्यांच्या मनःस्थितीविषयी विचारल्यावर ते अत्यंत सकारात्मकतेने बोलले. ते म्हणाले, ‘‘तुम्ही ‘सनातन चैतन्यवाणी ॲप’ची लिंक पाठवली होती. मी ते ‘ॲप डाऊनलोड’ केले आहे. त्यात सांगितलेले सर्वकाही मी ऐकतो. आता मी दत्तगुरूंचा नामजप चालू केला आहे. मी ते ‘ॲप’ अन्य लोकांनाही पाठवले आहे.

भगवंताने मला एवढ्या सुस्थितीत ठेवले आहे की, एवढ्या मोठ्या अपघातानंतरही मी बेशुद्धावस्थेत नाही आणि घरातील व्यक्तींवरही अवलंबून नाही. मी रुग्णालयात राहून पायावर औषधोपचार करून घेत आहे.’’

– सौ. राजरानी माहुर, देहली (६.३.२०२१)