हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे आमीष दाखवून धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या पाद्र्याच्या विरोधात तक्रार !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून चर्चमध्ये भजन

अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी धर्मांतरविरोधी कायदा हवा !

प्रतिकात्मक छायाचित्र

हुब्बळ्ळी (कर्नाटक) – येथे बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांच्या कार्यकर्त्यांनी एका चर्चमध्ये हिंदूंचे होणारे धर्मांतर रोखून तेथे भजन म्हटल्याची घटना १७ ऑक्टोबर या दिवशी घडली. येथील बैरीदेवरकोप्पा चर्चमध्ये ही घटना घडली. या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चर्चचा पाद्री सोमू अवराधी याला अटक करण्याची मागणी केली आहे.

बजरंग दलाचे राज्य संयोजक रघु सकलेशपोरा यांनी सांगितले की, विश्वनाथ नावाची एका व्यक्तीला पाद्री सोमू याने आमीष दाखवून धर्मांतरासाठी चर्चमध्ये आणले होते. तो चर्चमधून थेट पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने पाद्री सोमू आणि अन्य यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला. यानंतर आम्हाला याची माहिती मिळाल्यावर आम्ही चर्चमध्ये येऊन भजन म्हणू लागलो.