५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. वेदांग श्रीकर रेळेकर (वय ८ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. वेदांग श्रीकर रेळेकर हा एक आहेत !

कु. वेदांग रेळेकर

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. जन्म ते ३ वर्षे 

१ अ. जन्माच्या वेळी : ‘बाळाचा जन्म शस्त्रकर्म करून झाला. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्याने मी पूर्ण निर्विचार अवस्थेत होते. त्यामुळे मला कोणताही शारीरिक त्रास न जाणवता आनंदावस्था अनुभवता आली.

१ आ. बाळाच्या जन्मानंतर पहिले ४ मास ते जराही रडले नाही. याचे सर्व शेजार्‍यांना आश्चर्य वाटायचे. ‘बाळ सतत शांत आणि ध्यानावस्थेत आहे’, असे जाणवायचे.

१ इ. त्याची झोपेत श्रीकृष्णासारखी हाताची मुद्रा असायची.

१ ई. देवाची आवड : वेदांगला लहानपणापासून देवाची स्तोत्रे ऐकण्याची आणि म्हणण्याची आवड आहे. वेदांग २ वर्षांचा असतांना मित्राच्या समवेत मातीत खेळायचा. तेव्हा त्याने मातीची शिवपिंड केली होती. त्याने ‘ॐ नमः शिवाय ।’ असा नामजप करत शिवपिंडीची पूजा केली आणि मित्रांनाही तसा नामजप करायला सांगितला.

२. वय ४ ते ६ वर्षे 

श्री. श्रीकर रेळेकर

२ अ. प्रेमभाव

१. लहानपणापासून त्याला सर्व प्राण्यांची विशेष आवड आहे. तो मांजर आणि कुत्रा यांचे पिल्लू अन् शेळी यांना खाऊ घालत असे. तो त्यांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असे. तो नेहमी पक्ष्यांना पाणी आणि दाणे ठेवायचा.

२. वेदांग सर्वांशी नेहमी प्रेमाने बोलतो. तो आनंदी असल्यामुळे त्याची सर्व मुलांशी लवकर जवळीक होते. तो इतरांना समजून घेतो आणि ‘त्यांना काय पाहिजे ?’, हे अचूक ओळखतो, तसेच त्यांना स्वतःची आवडती वस्तूही अगदी सहजपणे देतो.

२ आ. उत्तम स्मरणशक्ती : त्याला देवतांची स्तोत्रे लवकर पाठ होतात. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी दिलेला सूर्यदेवाचा मंत्र संस्कृतमध्ये असूनही योग्य उच्चारांसह त्याला पाठ आहे.

२ इ. इतरांना साहाय्य करणे : कुणी पाणी मागितले, तर तो लगेच उठून पाणी देतो. बाहेरून आलेल्या व्यक्तीची विचारपूस करून त्यांना जे हवे असेल, ते आणून देतो. घरातील प्रत्येक कामात तो स्वतःहून साहाय्य करतो.

२ ई. भाव : वेदांगच्या समवेत कुणी खेळायला नसल्यास तो ‘श्रीकृष्ण माझ्या समवेत खेळत आहे’, असा भाव ठेवतो. तो सेवा करतांना किंवा खेळतांना प.पू. भक्तराज महाराज यांची भजने आवडीने म्हणतो.

३. वय ६ ते ७ वर्षे 

सौ. श्रावणी रेळेकर

३ अ. धर्माचरणाची आवड असून त्याविषयी प्रबोधन करणे : आम्ही त्याचा प्रत्येक वाढदिवस तिथीनुसार साजरा केला. त्याने त्याच्या आठव्या वाढदिवसाच्या निमित्ताने मित्रांना ‘वाढदिवस शास्त्रानुसार कसा साजरा करावा ?’ हे सांगितले. या वेळी त्याने सनातनच्या सात्त्विक लघुग्रंथांचे महत्त्व सांगून ते मित्रांना भेट दिले.

३ आ. रुग्णाईत असतांनाही स्थिर आणि शांत असणे : एप्रिल २०२० मध्ये वेदांगला लघवीचा त्रास झाला. त्या वेळी दळणवळण बंदी असतांना अनंत अडचणी येऊनही केवळ श्री गुरूंच्या कृपेने त्याच्यावर योग्य उपचार करणे शक्य झाले. या काळात तो स्थिर आणि शांत होता. तो सहा दिवस रुग्णालयात असतांना पूर्णपणे निर्विचार अवस्थेत असायचा. रुग्णालयात असतांनाही नामजपादी उपाय करत असल्याने केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने त्याचे सर्व वैद्यकीय अहवाल सर्वसामान्य आले.

४. स्वभावदोष

चिडचिडेपणा, आळस आणि रागीटपणा

‘हे श्रीकृष्णा, या सात्त्विक बालकाची सेवा करण्याची संधी तुझ्याच कृपेने आम्हाला प्राप्त झाली आहे. त्यासाठी आम्ही तुझ्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहोत.’

– सौ. श्रावणी श्रीकर रेळेकर आणि श्री. श्रीकर पुंडलिक रेळेकर (आई-वडील), इचलकरंजी, कोल्हापूर. (जुलै २०२०)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता