दुर्गापूर (बंगाल) येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन करून परतणार्‍या भाविकांवर अज्ञातांकडून आक्रमण !

  • पाक आणि बांगलादेश या इस्लामी देशांप्रमाणे बंगालमध्येही हिंदू असुरक्षित ! – संपादक 
  • बंगालमधील हिंदूंनी हिंदुद्वेषी ममता(बानो) बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला निवडून दिल्यामुळे त्यांच्यावर संकटांची मालिका चालू झाली आहे. तेथील हिंदूंच्या हे लक्षात येईल, तो सुदिन ! – संपादक 

दुर्गापूर (बंगाल) – येथे १६ ऑक्टोबरच्या रात्री श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन करून परतणार्‍या हिंदूंवर अज्ञातांनी आक्रमण करून त्यांच्या वाहनांची तोडफोड केली. या आक्रमणात काही जण घायाळ झाले. या घटनेनंतर येथे तणावाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन घायाळांना रुग्णालयात नेले. आक्रमण करणार्‍यांची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी पथके बनवली आहेत.