मुंबई – मादक पदार्थांचे सेवन आणि त्यामुळे होणारे अपप्रकार वाढत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी राज्यशासनाने कृती आराखडा सिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. १३ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत त्याला अनुमती देण्यात आली असून पुढील ५ वर्षांसाठी १३ कोटी ७० लाख रुपये इतक्या निधीचा प्रस्ताव केंद्रशासनाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात येणार आहे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी याविषयीची पत्रकारांना माहिती दिली.