शाळेमधील महिला कर्मचार्‍यांमुळे पुरुषांना डोकेदुखी थांबवण्यासाठी गोळी घ्यावी लागते ! – राजस्थानचे शिक्षणमंत्री गोविंदसिंह डोटासरा

राजस्थानमध्ये काँग्रेसचे राज्य आहे आणि काँग्रेसच्या अध्यक्षा एक महिला आहेत, तर प्रियांका वाड्रा या सरचिटणीस आहेत. त्यांना हे विधान मान्य आहे का ? ‘या दोघींमुळे काँग्रेसमधील पुरुषांना डोकेदुखी झाली आहे का ?’, असे कुणी विचारल्यास आश्‍चर्य वाटू नये ! – संपादक

राजस्थानचे शिक्षणमंत्री गोविंदसिंह डोटासरा

जयपूर (राजस्थान) – महिला भांडखोर असतात. त्यांचा हा गुणच त्यांना पुरुषांच्या पुढे जाण्यापासून रोखतो. ज्या शाळांमध्ये अधिक महिला कर्मचारी असतात, तेथे भांडणाचे प्रमाण अधिक असते. महिलांच्या शाळेतील भांडणांच्या संदर्भात माझ्याकडे अनेक तक्रारी येतात. महिलांच्या भांडणांमुळे शाळेतील पुरुष कर्मचारी अत्यंत त्रस्त असतो. महिलांच्या भांडणांमुळे तर अनेक वेळा पुरुष शिक्षक आणि प्राचार्य यांच्यावर ‘सॅरिडॉन’ गोळीही (डोकेदुखी थांबवण्यासाठीची गोळीही) घेण्याची वेळ येते, असे विधान राजस्थानचे शिक्षणमंत्री गोविंदसिंह डोटासरा यांनी केले. ते ‘आंतरराष्ट्रीय बालिकादिना’निमित्त बोलत होते.

‘जर महिलांनी छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये सुधारणा, केली, तर त्या पुरुषांच्याही पुढे असतील. सरकारने महिलांसाठी योजना आणल्या आहेत. सरकार महिलांना प्राधान्य देत आहे. त्यांनी या सर्व गोष्टींतून बाहेर पडून पुरुषांच्याही पुढे जावे’, असेही डोटासरा यांनी या वेळी स्पष्ट केले.