(म्हणे) ‘शेतकर्‍यांच्या मारेकर्‍यांना शिक्षा करण्यासाठी प्रियांका वाड्रा यांनी देवीचा अवतार घेतला !’ – काँग्रेसी कार्यकर्ते

वाराणसी येथे काँग्रेसींकडून प्रियांका वाड्रा यांना श्री दुर्गादेवीच्या रूपात दाखवणारे फलक प्रदर्शित

निधर्मी काँग्रेसवाल्यांना धर्माचे शिक्षण नसल्यामुळे ते अशा प्रकारे देवतेचा अवमान करत आहेत. अशांना ताळ्यावर आणण्यासाठी त्यांच्यावर गुन्हे नोंद करून त्यांना कारागृहात डांबण्यासाठी उत्तरप्रदेशातील भाजप सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक 

वाराणसी (उत्तरप्रदेश) – काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका वाड्रा यांनी नुकताच उत्तरप्रदेश राज्याचा दौरा केला. त्या वेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या फलकावर प्रियांका वाड्रा यांना श्री दुर्गादेवीच्या रूपात दाखवण्यात आले होते. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते की, राज्यातील शेतकर्‍यांसाठी प्रियांका वाड्रा या श्री दुर्गादेवीचा अवतारच आहेत. लखीमपूर खीरी येथे शेतकर्‍यांच्या हत्या करणार्‍यांना शिक्षा करण्यासाठी त्यांनी अवतार घेतला आहे. (अवतार कुणाला म्हणावे ?, हेही ठाऊक नसणारे काँग्रेसी ! – संपादक)